Amrit Bharat Train Fare: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे देशातील पहिल्या अमृत भारत ट्रेनला (Amrit Bharat Train) हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 30 डिसेंबर 2023 रोजी हा कार्यक्रम होणार आहे. श्रीरामनगर अयोध्येपासून (ayodhya) ते बिहारच्या दरभंगा जिल्ह्यासाठी ही ट्रेन धावणार आहे. ही अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक किलोमीटर ते 50 किलोमीटरच्या प्रवासासाठी, किमान भाडे 35 रुपये आकारणार आहे. ज्यामध्ये आरक्षण शुल्क आणि इतर प्रकारचे शुल्क समाविष्ट नसल्याची माहिती रेल्वे बोर्डाने दिली आहे. मात्र, इतर रेल्वेच्या तुलनेत या अमृत भारत ट्रेनचा प्रवास 17 टक्के महाग होणार आहे.
रेल्वे बोर्डाने सर्व झोनला एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये अमृत भारत ट्रेनच्या भाडे संरचनेची माहिती दिली आहे. ज्यामध्ये अंतर स्लॅबसह भाडे टेबल जोडलेले आहे. ज्यामध्ये द्वितीय श्रेणी आणि स्लीपर-क्लासचे भाडे दिले आहे. 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवणाऱ्या पहिल्या अमृत भारत ट्रेनला फक्त द्वितीय श्रेणी आणि स्लीपर श्रेणीचे डबे आहेत. एसी कोचचे भाडे रेल्वे बोर्डाने अद्याप ठरवलेले नाही.
अमृत भारत ट्रेनचे भाडे 15 ते 17 टक्क्यांनी महाग
रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमृत भारत ट्रेनच्या सेकंड आणि स्लीपर क्लासच्या भाड्याची तुलना इतर मेल किंवा एक्स्प्रेस ट्रेनच्या भाड्याशी केली तर अमृत भारत ट्रेनचे भाडे 15 ते 17 टक्क्यांनी महाग होईल. इतर गाड्यांमध्ये, 1 ते 50 किलोमीटरच्या प्रवासाचे भाडे आरक्षण शुल्क आणि इतर शुल्क वगळून 30 रुपये आहे. तर अमृत भारत ट्रेनचे भाडे 35 रुपये म्हणजेच 17 टक्के महाग आहे.
परिपत्रकात रेल्वे बोर्डाने म्हटले आहे की, या गाड्यांमध्ये सवलतीचे तिकीट स्वीकारले जाणार नाही. विशेषाधिकार पास, PTO (प्रिव्हिलेज तिकीट ऑर्डर), रेल्वे कर्मचार्यांसाठी ड्युटी पासची पात्रता मेल/एक्स्प्रेसमधील पात्रतेच्या समतुल्य असेल. परिपत्रकानुसार, खासदारांना जारी केलेले पास, आमदार-एमएलसी यांना जारी केलेले रेल्वे प्रवास कूपन (TRC) आणि स्वातंत्र्य सैनिकांना दिलेले पास यांच्या आधारे तिकीट बुक करण्याची परवानगी दिली जाईल. कारण त्यांची परतफेड करण्याची तरतूद आहे. रेल्वे बोर्डाने CRIS ला अमृत भारत ट्रेन आणि त्यांच्या भाड्यांबाबत सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करण्यास सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: