US Federal Reserve : अमेरिका हा देश जगातली महासत्ता आहे. या देशाने राबवलेल्या निर्णयाचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर पडतो. असे असताना आता अमेरिकेने व्याजदराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील मध्यवर्ती बँफ फेडरवल रिझर्व्हने तब्बल चार वर्षांनंतर व्याजदरात कपात करण्याचे जाहीर केले आहे. फेडवरल रिझर्व्हने व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने घट केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँक नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी (18 ऑक्टोबर) फेडरल रिझर्व्हने हा निर्णय घेतला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
अमेरिकेच्या फेडवरल रिझर्व्ह बँकेने याआधी 2020 साली व्याजदरात कपात केली होती. त्यानंतर आता चार वर्षांनी या बँकेने व्याजदरा 50 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. अमेरिकेत येत्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असतानाच आता फेडवरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेत आता व्याजदर किती होणार?
फेडवरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करण्यासाठी एक बैठक घेतली होती. या बैठकीत व्याजदर कपातीच्या बाजूने 11 सदस्यांनी मत दिले. तर एका सदस्याने व्याजदर कपातीस विरोध केला. त्यामुळे बहुमताचा सन्मान करत फेडवरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर आता अमेरिकेत व्याजदर 4.75 ते 5.00 टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे. फेडवरल रिझर्व्ह बँकेने या वर्षाच्या शेवटपर्यंत व्याजदरात आणखी कपात केली जाईल असे संकेत दिले आहेत. बँकेच्या या निर्णयानंतर आता लोकांना कर्ज घेणे सोपे होणार आहे. अमेरिकेतील वेगवेगळ्या बँखादेखील आपला व्याजदार कमी करणार आहेत.
व्याजदरात आणखी कपात होणार?
या श्रेत्रातील तज्ज्ञांच्या मते फेडवरल रिझर्व्ह ही बँक भविष्यातही व्याजदरात कपात करू शकते. या वर्षांच्या शेवटपर्यंत अर्ध्या टक्क्याने तर 2025 साली एक टक्क्याने आणि 2026 साली पुन्हा अर्ध्या टक्क्याने व्याजदरात कपात होऊ शकते. ही कपात झाली तर अमेरिकेत व्याजदर 2.75 ते 3.0 टक्क्यांच्या आसपास असू शकतो.
अमेरिकेत महागाई दर किती?
फेडवरल रिझर्व्ह बँकेच्या मतानुसार अमेरिकेत महागाई दर 2 टक्क्याच्या दिशेने जात आहे. तसेच अमेरिकेत नोकऱ्यांची स्थिती चांगली आहे. चौथ्या तिमाहीत बेरोजगारी दर (Unemployment Rate) साधारण 4.4 टक्के राहू शकतो. तर महागाई दर 2.3 टक्के राहण्याची शक्यता आहे. दरम्यान अमेरिकन बँकेच्या या निर्णयानंतर भारताची रिझर्व्ह बँक व्याजदराबाबत नेमका काय निर्णय घेणार? भविष्यात भारतात कर्ज स्वस्त होणार का? असे विचारले जात आहे.
हेही वाचा :
पाच शेअर करणार धमाका! पैसे गुंतवल्यास देणार दमदार रिटर्न्स; जाणून घ्या स्टॉप लॉस, टार्गेट किती?
पर्सनल लोन घेताना 'या' तीन चुका कधीच करू नका, अन्यथा मोठ्या अडचणीत सापडाल?