Elon Musk: टेस्लाचे मालक (Tesla) आणि ट्विटरचे सीईओ (Twitter CEO)  इलॉन मस्क यांनी फेड रिझर्व्हवर नाराजी व्यक्त केली आहे. पुढील आठवड्यात अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह (Federal Reserve) व्याजदर वाढवू शकते. विशेष म्हणजे अमेरिकेतील वाढत्या महागाईवर नियंत्रण (Inflation Control) ठेवण्यासाठी फेड रिझर्व्ह पुढील आठवड्यात असे करू शकते. आता इलॉन मस्क (Elon Musk) यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुढील आठवड्यात फेड रिझव्‍‌र्हने व्याजदरात वाढ केल्यास आगामी काळात अमेरिकेतील मंदी अनेक पटींनी वाढेल, असे मस्क म्हणाले आहेत.


ट्विटरचे मालक इलॉन मस्क (Elon Musk)  यांना एका ट्विटर युजरने विचारले की, मंदी कधी येऊ शकते, असे तुम्हाला वाटते. या प्रश्नाला उत्तर देताना मस्क (Elon Musk) म्हणाले की, फेडने व्याजदर पुन्हा एकदा वाढवले ​​तर मंदीची शक्यता खूप वाढेल. तज्ज्ञांच्या मते, फेडरल रिझर्व्ह पुढील आठवड्यात व्याजदरात वाढ करण्याची घोषणा करू शकते.






गेल्या महिन्यात मस्क (Elon Musk) म्हणाले होते की, अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीच्या (अमेरिकेतील मंदी) दिशेने वाटचाल करत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात सातत्याने होणारी वाढ. मस्क (Elon Musk) म्हणाले होते की, जर फेड रिझर्व्हला देशात येणारी मंदी थांबवायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर व्याजदर कमी करावेत. अन्यथा यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो.


Elon Musk on Fed Reserves Hike: फेड रिझर्व्हने अनेक वेळा वाढवले ​​आहेत व्याजदर 


दरम्यान, फेड चेअर जेरोम पॉवेल ( Fed Chair Jerome Powell) यांनी सूचित केले केले आहे की फेड रिझर्व्ह लवकरच त्याच्या व्याजदरांमध्ये थोडी वाढ करू शकते. ही वाढ 0.5 ते 0.75 टक्के असू शकते. ही घोषणा 0.75 टक्क्यांपर्यंत असू शकते. यापूर्वी फेड रिझर्व्हने या वर्षी अनेक वेळा व्याजदर वाढवले ​​आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला फेडने व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ केली होती.


इतर महत्वाच्या बातम्या: