मुंबई : येत्या 10 मे रोजी अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2024) आहे. भारतात अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते. याच पार्श्वभूमीवर देशातील नामंवत ज्वेलरी ब्रँड यावेळी दर्जेदार ऑफर्स घेऊन आले आहेत. या ज्वेलरी ब्रँड्सकडून सोन, हिऱ्याच्या दागिन्यांच्या खरेदीनंतर घडणाळीवर बम्पर सूट दिली जात आहे. विशेष म्हणजे ही सूट चक्क 25 टक्क्यांपर्यंत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील कोणकोणत्या ज्वेलरी ब्रँड्सकडून कोणत्या ऑफर्स दिल्या जात आहेत? ते जाणून घेऊ या... 


या ठिकाणी मिळतेय बम्पर ऑफर


Tanishq मध्ये 20 टक्क्यांची सुट


टाटा उद्योग समुहाच्या तनिष्क या प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडने अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोने, हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर चांगली सूट दिली आहे. या ब्रँडकडून सोने आणि हिऱ्याच्या  दागिन्यांच्या घडणावळीवर 20 टक्के सूट देत आहे. या ऑफरचा फायदा 2 ते 12 मे या काळात घेता येईल. 


Malabar Gold कडून जबरदस्त डिस्काउंट 


मालबार हा देशभरात प्रसिद्ध असलेला ज्वेलरी ब्रँड आहे. या ब्रँडनेदेखील अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर  सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 25 टक्के सुट देण्याची घोषणा केली आहे. ही ऑफर 27 ते 12 मे 2024 पर्यंत चालू असेल. हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवरही या ब्रँडकडून 25 टक्के सुट दिली जात आहे. तुमच्याकडे एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर 25,000 रुपयांपेक्षा जास्त खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅकही दिले जाणार आहे. ही ऑफर 10 मेपर्यंत चालू असणार आहे.


Mellora कडूनही चांगली ऑफर


फॅशनेबल ज्वेलरी ब्रँड Mellora नेही हिरे आणि जेमस्टोनच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 25 सुट जाहीर केली आहे. अक्षय तृतीया दिनापर्यंत या ऑफरचा फायदा घेता येईल  


Joyalukkas तर्फे दिले जातायत गिफ्ट व्हाऊचर्स 


अक्षय तृतीयेच्या निमित्ताने Joyalukkas ज्वेलरी ब्रँडकडून 50,000 सोने खरेदीवर 1,000 रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर दिले जात आहे. ही ऑफर 3 मे पासून 13 मेपर्यंत चालू असेल. यासह 10,000 हजार रुपयांपेक्षा अधिक चांदीचे दागिने खरेदी केल्यास 500 रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर दिले जाणार आहे. 50,000 रुपयांपेक्षा अधिक हिऱ्यांचे दागिने खरेदी केल्यास  2,000 गिफ्ट व्हाऊचर दिले जाणार आहे. ही ऑफर 26 एप्रिल ते 12 मे 2024 पर्यंत व्हॅलिड असेल. 


हेही वाचा :


जगातील कोणत्या देशाकडे आहे सर्वाधिक सोनं, भारताच्या सरकारी खजान्यात किती टन सोनं?


'या' पाच शेअर्सचा विषय खोल, पैसे गुंतवल्यास मिळू शकतात तब्बल 'इतके' टक्के रिटर्न्स!


निवडणूक संपताच सामान्यांच्या खिशाला बसणार झळ? मोबाईलचा डेटा पॅक महागणार?