Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. एका पत्नीनं आपल्या पतीला निर्दयीपणे, अमानुष मारहाण (Crime News) केलीय. या घटनेचा हादरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पीडित पतीनं स्वतः पोलिसांत पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारा व्हिडीओ महिलेनं स्वतः व्हायरल केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. 


उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये ही घटना घडली असून संपूर्ण देशभरात या घटनेनं खळबळ माजली आहे. एका महिलेनं पतीच्या छातीवर बसून त्याच्या शरीराला सिगारेटनं चटके दिले. तसेच, त्याचे हात बांधून, त्याला अमानुषपणे मारहाणंही केली आहे. याप्रकरणी पीडित पतीनं पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. महिलेने पतीला जाळल्याचे सीसीटीव्ही फुटेजही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


पत्निला अटक केल्यानंतर पोलिसांनी पतीचा जबाब नोंदवला. त्यावेळी घडलेल्या भयावह घटनेचा खुलासा स्वतः पतीनं केला आहे. बियर, बिर्याणी, सिगारेट आणि गुटख्याच्या व्यसनामुळे त्याची पत्नी मेहर जहाँ हिंसक बनल्याचे पीडितेचे पती मनन झैदी यानं पोलिसांना सांगितलं.






नेमकं काय घडलं? खुद्द पीडित पतीनं सांगितलं...


स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पतीनं सांगितलं की, जेव्हा बियर, बिर्याणी, सिगारेट आणि गुटखा या गोष्टींची मागणी पूर्ण होत नव्हती, तेव्हा मेहर अनेकदा त्याच्यावर हल्ला करायची. त्याला अडकवण्याची धमकीही द्यायची. पीडितेचा पती मनन जैदीनं पुढे सांगितलं की, मेहर जहाँसोबत प्रेमविवाह केला होता, पण लग्न होताच तिचा स्वभाव बदलला आणि तिनं दारूच्या नशेत त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली.


आता पतीच्या तक्रारीवरून सिओहरा पोलिसांनी मेहर जहाँला अटक केली आहे. मेहरनं आधी मला अंमली पदार्थ पाजले आणि नंतर हातपाय बांधले आणि जळत्या सिगारेटनं शरीराच्या अवयवांवर चटकेही दिले, असा आरोप पीडित पती मनन झैदीनं केला आहे.


पतीला सिगारेटचे चटके दिल्याचा VIDEO व्हायरल 


पतीनं पोलिसांना घरातील सीसीटीव्ही फुटेज दिलं, ज्यामध्ये मेहर जहाँ त्याच्यावर शारीरिक हल्ला करताना, हात-पाय बांधून आणि छातीवर बसवून त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती जळत्या सिगारेटनं पतीच्या शरीराला चटके देताना दिसत आहे. मनन झैदीनं दावा केला आहे की, त्यानं यापूर्वी पोलिसांकडे तक्रार देखील केली होती, ज्यामध्ये त्यानं आपल्या पत्नीला मादक पदार्थ देऊन तिचा छळ केला, तिचे हात पाय बांधले आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


आधी लग्न, मग पाठवणी अन् मधुचंद्राच्या रात्रीच भयावह कांड; सासरच्यांची थेट पोलिसांत धाव, नेमकं घडलं काय?