मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. या चर्चेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझील लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असं म्हटलं.  लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार मात्र बंद करणार नाही, असं अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे, असं अजित पवार म्हणाले.  


अजित पवार यांनी या उत्तरामध्ये बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठ्या घोषणा केल्या. लाडकी बहीण योजनेतून ज्यांची नावे कमी झाली आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत.लाडकी बहीण योजनेत दुरूस्ती करणार आहोत,पण योजना बंद करणार नाहीत, असं म्हणत अजित पवार यांनी योजनेत नवे निकष आणण्याचे संकेत दिले. लाडकी बहीण अर्थव्यवस्थेलाही चालना देणार असल्याचं ते म्हणाले.


अजित पवार म्हणाले या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे, याचाही विचार करतो.1500 रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे.  महिला सक्षमीकरणाचं एक मोठ पाऊल सरकारने उचललं आहे.   
 
परवाच विधान परिषदेत गटनेते प्रविण दरेकर यांनी केलेली एक घोषणा माझ्या वाचनात आली.  लाडकी बहीण योजनेच अकाऊंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँक १० ते २५ हजारापर्यंतचं कर्ज देणार आहे. राज्यात महिला आर्थिक विकास  महामंडळासारखी संस्था आहे, जिल्हा सहकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत. मी आपल्या सर्वांना एक नम्रतेचं आवाहन करणार आहे.  ज्या महिलाना छोटा, मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा.  म्हणजे, ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाउल पुढे टाकू, असं अजित पवार म्हणाले. 


महिलांच्या हातात 45 हजार कोटी जाणार


अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या हातात मोठी रक्कम जाणार असल्याचं म्हटलं. हा थोडाथडका पैसा नाही. सुमारे 45 हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत.या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटं, मोठं योगदान मिळेल, असं अजित पवार म्हणाले.



इतर बातम्या :


Maharashtra Vidhan Parishad Election 2025: विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे हिरमुसल्या, म्हणाल्या, 'जो चाह थी मेरी, वो मुझे नहीं मिली'