AI on India GDP : जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब वाढत आहे. एआयच्या (Artificial intelligence) उदयाचा परिणाम जवळपास प्रत्येक क्षेत्रावर होऊ लागला आहे. आगामी काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा भारतीय अर्थव्यवस्थेला खूप फायदा होणार आहे. AI मुळं भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ होऊ शकते. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 7 वर्षांत अब्जावधी डॉलर्सचा GDP होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


भारतीय GDP मध्ये योगदान


भारतीय अर्थव्यवस्थेवर AI च्या संभाव्य परिणामांबाबत एक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जनरेटिव्ह एआयमुळे भारतात नावीन्य आणि उत्पादकतेचे नवे पर्व सुरू होईल. हे जनरेटिव्ह AI पुढील सात वर्षांत भारतीय GDP मध्ये 1.2 ट्रिलियन ते 1.5 ट्रिलियन डॉलर्सचे योगदान देऊ शकते, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे. 


शिक्षण आणि उच्च कौशल्य यामध्ये AI महत्त्वपूर्ण योगदान देणार


शिक्षण आणि उच्च कौशल्य हे जनरेटिव्ह AI भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देईल. डिजिटल जगात, प्रतिभा कुठूनही उदयास येऊ शकते. अशा परिस्थितीत, डिजिटल कौशल्ये गेम चेंजर्स सिद्ध होतील आणि भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा फायदा घेतील आणि कोट्यावधी लोकांना चांगल्या मार्गाने समान संधी प्रदान करतील.


कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची भूमिका बजावणार : सत्या नडेला


मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला (Satya Nadella) यांनाही विश्वास आहे की, एआय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गेमचेंजर सिद्ध होणार आहे. नडेला नुकतेच भारतात आले आहेत. भारताला पुढील दोन वर्षांत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी दिली.  बुधवारी ते मुंबईतील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. 


20 लाख भारतीयांना प्रशिक्षण मिळणार 


मायक्रोसॉफ्टच्या सीईओ सत्या नडेला यांनी 20 लाख भारतीयांना आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कुशल बनवण्याची घोषणा केली. आगामी काळात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या ग्रामीण भारतात स्थलांतरित होतील आणि त्यामुळे मोठा बदल होईल. मी माझ्या आयुष्यात AI सारखे काहीही पाहिले नाही आणि ते सध्याच्या पातळीच्या पलीकडे जाणार असल्याचे सत्या नडेला म्हणाले. 



आर्टिफिशल इंटेलिजन्सला मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. AIआर्टिफिशल इंटेलिजन्स हा कॉम्प्युटर सायन्सचा एक भाग आहे. संगणक प्रणालीद्वारे माणसाच्या बुद्धीप्रमाणे काम करते. याच तंत्रज्ञानाद्वारे कोणतीही मशीन माणसासारखे बोलू शकते,वाचू शकते अनेक गोष्टी मांणसापेक्षाही अधिक सहज करते.


महत्वाच्या बातम्या:


गरिबीशी लढा देण्यासाठी AI हे शक्तिशाली साधन, स्टार्टअप प्रणालीत देशाची जगात ओळख : गोयल