success story : अनेकदा चांगल शिक्षण घेऊन नोकरीसाठी प्रयत्न करुन देखील हाती काही लागत नाही. अशा वेळा अनेकजन निराश होतात. तर काहीजण वेगला मार्ग निवडतात. अशाच एका तरुणाला प्रयत्न करुनही नोकरी लागली नाही. पण तो निराश न होता, त्याने नवीन व्यवसायाचा मार्ग निवडला आहे. तो तरुण आज शेणाच्या व्यवसायातून लाखो रुपये कमवत आहे.
उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील रहिवासी असलेल्या नागेंद्र पांडे या शेतकऱ्याने कृषी विषयात पदवी घेतली आहे. यानंतर त्यांनी नोकरीचा शोध सुरु केला. मात्र, यामध्ये त्यांना यश मिळाले नाही.अनेक वर्षे नोकरीसाठी प्रयत्न केल्यानंतर अखेर त्यांनी वडिलोपार्जित जमिनीवर शेती करण्यास सुरुवात केली. देशभरातील मोठ्या संख्येने शेतकरी शेतीत रासायनिक खतांचा वापर टाळू लागले आहेत. ते आता सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी आणि पशुपालकांना सेंद्रिय खताच्या व्यवसायातून नफा मिळविण्याची संधीही वाढली आहे. उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या नंदना गावात राहणारा नागेंद्र पांडे वर्मी कंपोस्ट खत व्यवसायातून वर्षाला लाखो रुपयांचा नफा कमवत आहे.
नोकरी मिळाली नाही म्हणून शेतीचा पर्याय
नागेंद्र पांडे यांनी कृषी विषयात पदवी घेतली आहे. ग्रॅज्युएशननंतर त्यांनी नोकरीच्या शोधात सुरुवात केली, मात्र यश मिळाले नाही.अनेक वर्षे नोकरीसाठी प्रयत्न केल्यानंतर अखेर त्यांनी वडिलोपार्जित जमिनीवर शेती करण्यास सुरुवात केली. एवढ्या कमी जमिनीत शेती करून फार काही कमावता येणार नाही हे त्याला माहीत होते. अशा परिस्थितीत जमिनीच्या काही भागावर सेंद्रिय खत तयार करायचे आणि उरलेल्या भागात सेंद्रिय शेती करायची असा निर्मय त्यांनी घेतला.
गांडूळ खत बनवण्याचा निर्णय
नागेंद्र यांनी 2000 साली ठरवले की जमिनीच्या काही भागावर गांडूळ खत तयार करायचा. उर्वरित भागात सेंद्रिय शेती करायची. गांडूळ खत तयार करण्यासाठी सुरुवातीला त्यांना गांडुळांची गरज होती. यासाठी त्यांनी कृषी व फलोत्पादन विभागाशी संपर्क साधला, मात्र येथून गांडुळे सापडले नाहीत. यानंतर त्याच्या एका मित्राने त्याला सुमारे 40 ते 50 गांडुळे दिली. त्यानंतर नागेंद्र यांनी 45 दिवसांत दोन किलो गांडुळे तयार झाली. मग याच बेडपासून वर्मी कंपोस्टपासून सुरुवात केली.
एका वर्षात सुमारे 12 ते 15 हजार क्विंटल गांडूळ खत तयार
गांडूळ खत विक्रीतून लाखोंची कमाई करणाऱ्या नागेंद्र पांडे यांनी एका बेडपासून गांडूळ खत बनवण्यास सुरुवात केली. आज त्यांनी सुमारे एक एकरमध्ये 500 बेड तयार केले आहेत. आज ते एका वर्षात सुमारे 12 ते 15 हजार क्विंटल गांडूळ खत तयार करत आहेत. यातून ते लाखोंचा व्यवसाय करतात. यामुळे नागेंद्र इतर शेतकऱ्यांनाही गांडूळ खत तयार करण्याचे प्रशिक्षण देतात.
महत्त्वाच्या बातम्या: