Inflation under control : नोव्हेंबर महिन्यात डाळी, टोमॅटो, कांदा आणि इतर भाज्यांच्या दरात वाढ झाली होती. यामुळं किरकोळ महागाई दर (Marginal inflation rate) हा 5.5 टक्क्यांच्या वर पोहोचली आहे. मात्र, अशातच केंद्र सरकारने यापूर्वी महागाई (Inflation) नियंत्रणात आणण्यासाठी डाळी, गहू, कांद्याच्या किमती कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे गेल्या आठवडाभरात या वस्तूंच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, या वस्तूंच्या किंमती कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय.


गेल्या एका आठवड्यात स्वयंपाकघरातील जीवनावश्यक वस्तूंच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या आठवड्यात, केंद्र सरकारने किंमत नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळं डाळी, गहू आणि कांद्याच्या किंमतीत लक्षणीय घसरण झाली आहे. या काळात दर किती आणि कसे कमी झाले ते पाहुयात.


या वस्तूंच्या दरात 15 टक्क्यांची घसरण 


केंद्र सरकारने व्यापाऱ्यांकडे ठेवलेल्या साठ्यावर कडक कारवाई केल्यानंतर गेल्या चार दिवसांत गव्हाचे भाव 15 टक्क्यांनी घसरले आहेत. त्याचप्रमाणे, केंद्राने 8 डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणि पिवळा वाटाणा शुल्कमुक्त आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील लासलगाव एपीएमसीमध्ये कांदा आणि डाळींच्या घाऊक भावात 15 ते 20 टक्क्यांनी घसरण झाली आहे.


गहू किती स्वस्त झाला?


सरकार ज्या प्रकारे सर्व वस्तूंवर नियंत्रण ठेवत आहे आणि खुल्या बाजार विक्री योजनेमुळं (OMSS) स्टॉकिस्ट गव्हाचा साठा ठेवण्यात रस घेत नाहीत. खुल्या बाजारात गव्हाचा भाव 27 रुपये किलोवरून 25 ते 25.50 रुपये किलोपर्यंत घसरला आहे. मात्र, किंमती हळूहळू पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.


कांद्याच्या दरात मोठी घसरण


सरकारनं कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळं कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. लासलगाव एपीएमसीमध्ये मंगळवारी (12 डिसेंबर) कांद्याला सर्वाधिक 34 रुपये प्रति किलोला दर मिळाला. 7 डिसेंबर रोजी 42 रुपये प्रति किलो होता, तर जुन्या कांद्याची सरासरी किंमत 33 रुपये प्रति किलोवरुन 28 रुपये प्रति किलोपर्यंत घसरली. केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, जानेवारीपर्यंत कांद्याचे दर 40 रुपयांच्या खाली जाण्याची 


डाळीही स्वस्त झाल्या


महाराष्ट्राच्या लातूर एपीएमसीमध्ये, उडीद आणि हरभरा यांच्या घाऊक भावात प्रति किलो 5 रुपयांनी घसरण झाली आहे, तर तूर आणि मटर (मटार) च्या दरात अनुक्रमे 7 रुपये आणि 15 रुपये प्रति किलोने घसरण झाली आहे. डाळींचे भाव तर खाली आले आहेतच पण मागणीही कमी आहे. 


व्यवसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2024 पर्यंत देशात किमान 300,000 टन वाटाणे आयात केले जाऊ शकतात, ज्यामुळे हरभरा डाळीच्या किमती नियंत्रणात राहतील अशी अपेक्षा आहे. हरभऱ्याची वार्षिक पेरणी सध्या 9 टक्क्यांनी मागे आहे. तुरीच्या बाबतीत, स्थानिक मंडईत आधीच आवक सुरू झालेल्या स्थानिक पिकांव्यतिरिक्त, म्यानमारमधून तूर आयात जानेवारीमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


महागाई नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारचा प्लॅन, गव्हाच्या बाबतीत उचललं 'हे' मोठं पाऊल