Dal Price News : चालू जून महिन्यात अनेक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. जून महिन्यात बटाटे (Potato), कांदा (onion), टोमॅटोनंतर (Tomato) डाळींचे (Dal) भाव देखील वाढले आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशाची राजधानी दिल्लीत हरभरा डाळीच्या किंमतीत 11 टक्क्यांहून वाढ झालीय. त्याचबरोबर तूर आणि उडदाच्या दरातही 3 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दरम्यान, या वाढत्या दराचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. 


डाळीच्या दरात 11 टक्क्यांहून अधिक वाढ


जून महिन्यात डाळींच्या किंमतीत वाढ झाली आहे. जून महिन्यात बटाटे, कांदा, टोमॅटोसह डाळींच्या दरात वाढ झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत हरभरा डाळीच्या दरात 11 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर कांद्याच्या भावात 67 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तूर, उडीद, मूग यांच्या दरात वाढ झाली आहे. देशातील बटाटे, कांदा आणि टोमॅटोच्या सरासरी दरांवर नजर टाकली तर सर्वाधिक वाढ टोमॅटोमध्ये झाली आहे. टोमॅटोच्या दरात 31 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर हरभरा आणि तुरीच्या दरात देखील सरासरी 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.


देशात डाळींच्या दरात सरासरी किती वाढ



  • ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 31 मे रोजी हरभरा डाळीची किंमत 86.12 रुपये प्रति किलो होती. ज्यात 2.13 टक्के म्हणजेच 19 जूनपर्यंत 1.84 रुपयांची वाढ झाली. आज डाळीची किंमत 87.96 रुपये झाली आहे.

  • 31 मे रोजी तूर डाळीची किंमत 157.2 रुपये प्रति किलो होती. त्यात 19 जूनपर्यंत 4.07 रुपये म्हणजेच 2.58 टक्के वाढ झाली आहे. तूर डाळीचा भाव हा 161.27 रुपये प्रति किलो झाला आहे.

  • उडीद डाळीच्या सरासरी दरात फारशी वाढ झालेली नाही. आकडेवारीनुसार, 31 मे रोजी 125.79 रुपये किंमत होती. ती वाढून 126.69 रुपये प्रति किलो झाली आहे. म्हणजेच या कालावधीत 0.90 रुपयांची म्हणजेच 0.71 टक्के वाढ झाली आहे.

  • जून महिन्यात मूग डाळीच्या सरासरी दरात किंचित वाढ झाली आहे. 31 मे रोजी त्याची किंमत 118.32 रुपये होती, जी 19 मे पर्यंत 119.04 रुपये प्रति किलो झाली. म्हणजेच या कालावधीत किंमतीत 0.72 रुपयांची म्हणजेच 0.60 टक्के वाढ झाली आहे.

  • देशात मसूरच्या सरासरी किमतीत 0.22 रुपयांनी म्हणजेच 0.23 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळं 31 मे रोजी 93.9 रुपये असलेली किंमत वाढून 94.12 रुपये झाली आहे.


दिल्लीत डाळींचे किती वाढले? 



  • देशाची राजधानी दिल्लीत 31 मे रोजी हरभरा डाळीची किंमत 87 रुपये होती, जी 19 जून रोजी 97 रुपये प्रति किलो झाली. या काळात हरभरा डाळीच्या दरात 11 टक्के म्हणजेच 10 रुपयांनी वाढ झाली आहे.

  • तूरच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे 2.31 टक्के म्हणजेच 4 रुपये वाढ झाली आहे. त्यानंतर 31 मे रोजी दिल्लीत डाळींचा भाव 173 रुपये प्रति किलो होता. जो 19 जून रोजी वाढून 177 रुपये प्रति किलो झाला.

  • दिल्लीतही उडदाची डाळ महाग झाली आहे. ज्यामध्ये जून महिन्यात 3.52 टक्के म्हणजेच 5 रुपयांची वाढ झाली आहे. 31 मे रोजी दिल्लीत उडीद डाळीचा भाव 142 रुपये होता, तो वाढून 147 रुपये प्रति किलो झाला.

  • दिल्लीत मूग डाळीच्या दरात 3.25 टक्के म्हणजेच 4 रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. अशा स्थितीत 31 मे रोजी 123 रुपये किलो असलेल्या मूग डाळीचा भाव 19 जून रोजी 127 रुपये किलो झाला.

  • देशाची राजधानी दिल्लीत मसूरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आकडेवारीनुसार, 31 मे रोजी मसूर डाळ 90 रुपये किलो होती, मात्र 19 मे रोजीही 90 रुपये प्रतिकिलोवर दिसून आली.


महत्वाच्या बातम्या:


टोमॅटोची 'लाली' वाढली! दरात दुपटीनं वाढ, शेतकऱ्यांना होतोय फायदा