Reliance In FMCG: रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) आपली नजर एफएमसीजी (FMCG) सेक्टरमध्ये वळवली आहे. आगामी काळात एफएमसीजी सेक्टरमध्ये आपला पाया भक्कम करण्यासाठी रिलायन्स या क्षेत्रातील कंपन्यांवर लक्ष आहे. रिलायन्सकडून FMCG क्षेत्रातील कंपनी खरेदी करण्यावर जोर दिला जात आहे. या कंपन्यांमुळे रिलायन्सला FMCG क्षेत्रात प्रवेश करणे सोपं होणार आहे. रिलायन्सने कॅम्पा कोला (Campa Cola) कंपनी खरेदी केल्यानंतर आता त्यांचे आणखी तीन कंपन्यांवर आहे. 


कॅम्पा कोला ब्रॅण्ड भारतातील शीतपेयांच्या बाजारपेठेवर वर्चस्व गाजवले होते. मात्र, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेत ही कंपनी मागे पडली होती. रिलायन्स समूहाने Pure Drinks Group कडून कॅम्पा कोला ब्रॅण्ड 22 कोटी रुपयांना खरेदी केला. त्यानंतर आता तीन कंपन्यांसोबत रिलायन्सची चर्चा सुरू आहे. 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, रिलायन्स सध्या गार्डन नमकीन (Garden Namkeens), लाहौरी जिरा (Lahori Zeera) आणि बिंदू बेव्हरेज (Bindu Beverages) या कंपन्या खरेदी करण्यासाठीची चर्चा सुरू आहे. 


कंपनीकडून आपल्या रणनीतिनुसार,  FMCG सेक्टरमधील इतर कंपन्या खरेदी करण्याकडे रिलायन्स जोर देत आहे. या तीन कंपन्यांसोबत रिलायन्सची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. रिलायन्स इतर कंपन्यांनाही खरेदी करण्याची शक्यता आहे. रिलायन्स सध्या कराराच्या नियमांवर चर्चा करत असल्याचे वृत्त आहे. 'इकॉनॉमिक टाइम्स'कडून संबंधित तीन कंपन्यांना रिलायन्ससोबतच्या करारावर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर कंपनीने उत्तर दिले नाही. 


कोणतीही मोठी कंपनी नव्या क्षेत्रात येण्याआधी त्या क्षेत्रातील कंपनी अधिग्रहित करण्याचा प्रयत्न करते. यामुळे त्या कंपनीला आधीच उपलब्ध असलेली बाजारपेठ, वितरण साखळी आणि त्या ब्रॅण्डवर विश्वास ठेवणारा ग्राहक मिळतो, याकडे जाणकरांनी लक्ष वेधले. 


रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स रिटेल FMCG क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची घोषणा केली होती. भारतीयांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील अशा उच्च गुणवत्ता असलेल्या वस्तूंचे किफायती दरात उत्पादन करणे आणि वितरण करण्याचे उद्दिष्ट रिलायन्स कंपनीने ठेवले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: