Gautam Adani Company : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांची कंपनी अदानी विल्मरने एका कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. कंपनीचा आरोप आहे की, फॉर्च्यून ऑईल ब्रँडच्या नावाने बनावट उत्पादने विकली जात आहेत, ज्यामध्ये या कंपनीचे नाव आहे. अशा परिस्थितीत अदानी विल्मरने गौतम बुद्ध नगरमध्ये पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अदानी विल्मर भारतातील अनेक राज्यांमध्ये 'फॉर्च्युन' या ब्रँड नावाने खाद्यतेल विकते. 


खाद्यतेलाच्या प्रमुख कंपनीच्या नियमित बाजार सर्वेक्षणात हे आढळून आले आहे. कंपनीने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, बनावट उत्पादने बनवणे आणि विकल्याबद्दल त्यांनी B2B प्लॅटफॉर्मच्या विरोधात एजन्सीद्वारे एफआयआर नोंदवला आहे. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील बदलपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अदानी म्हणाले की, तपास अधिकाऱ्यांनी बिझनेस टू बिझनेस प्लॅटफॉर्मच्या गोदामावर छापा टाकला, ज्यामध्ये अदानी विल्मरच्या फॉर्च्यून ऑईलच्या नावाने बनावट उत्पादने जप्त करण्यात आली आहेत.


छाप्यात काय सापडले?


अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात फॉर्च्युन ब्रँडचे तेल मोठ्या प्रमाणात सापडले आहे. जप्त केलेल्या उत्पादनांमध्ये फॉर्च्युन कची घनी मोहरी तेलाच्या 126 पेट बाटल्या (1 लीटर पॅक), 1 लीटर पाऊचमध्ये 37 बनावट फॉर्च्यून रिफाइंड सोयाबीन तेल आणि 1 लीटर पॅकमध्ये फॉर्च्युन मस्टर्ड ऑईलच्या 16 बाटल्यांचा समावेश आहे. अदानी विल्मरच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'बाजारात पसरत असलेल्या बनावट उत्पादनांची आणि ग्राहकांच्या आरोग्याची कंपनीला चिंता आहे त्यामुळेच तक्रार दाखल करण्यात आली आहे. '


बनावट उत्पादनात 'या' गोष्टींचा तपास 


कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, बनावट उत्पादनांचा मुद्दा गांभीर्याने घेत, कंपनी बनावट वस्तूंचे स्त्रोत त्वरीत ओळखण्यासाठी आणि अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहे. निवेदनानुसार, कंपनीने अहवाल दिलेल्या उत्पादनाची चौकशी सुरू केली आहे. बनावट ब्रँडच्या तपासात बॅच कोड तपशील, बनावट क्यूआर कोड आणि पॅकेजिंग इत्यादी गोष्टींवर गांभीर्याने लक्ष दिलं जात आहे. 


खाद्यतेलाच्या किंमतीत कपात 


अदानी विल्मरने बुधवारी सांगितले की, खाद्यतेलाच्या किंमतीत तीव्र घसरण आणि त्यांच्या खाद्य उत्पादनांची मागणी यामुळे पहिल्या तिमाहीत विक्री 15 टक्क्यांनी घसरली आहे. ग्राहकांची मागणी कमी, काही प्रदेशात कमी पुरवठा आणि तेलबियांचे मजबूत उत्पादन यामुळे ही घसरण झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत खाद्यतेलाच्या किमती घसरल्या आहेत असंही कंपनीने म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


Reliance Industries:  रिलायन्स इंडस्ट्रीजकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर; नफ्यात 11 टक्क्यांची घट