Adani Group: पोर्ट पासून ते ऊर्जा क्षेत्रापर्यंत पसरलेला अदानी समूह आता इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात उतरू शकतो. यासाठी 'अदानी' या नावाने ट्रेडमार्क नोंदणीकृत करण्यात आला आहे. यामुळे टाटा, रिलायन्स यांच्याशी थेट स्पर्धा होणार असल्याचं बोललं जातंय...



ग्रीन एनर्जीचे शेअर्स वाढले - 
अदानी समुहाच्या या योजनेची माहिती समोर आल्यानंतर अदानी ग्रीन एनर्जी शेअर्स 1,990 रुपयांच्या एका वर्षातील उच्चांकावर गेले. यासोबतच त्याचे मार्केट कॅप 3 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. समूहाच्या 6 सूचिबद्ध कंपन्यांमध्ये ही पहिली कंपनी आहे, ज्याची उलाढाल आता 3 लाख कोटी रुपयांची झाली. सलग चार दिवस बाजारात मोठी घसरण सुरू असताना मात्र हा शेअर उसळी घेताना दिसला.




अदानी सर्वात श्रीमंत उद्योगपती - 
भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांची कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी अदानी ट्रेडमार्कचाच वापर करणार आहे. समूह प्रथम इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांवर लक्ष केंद्रित करेल. यामध्ये कोच, बस आणि ट्रकचा समावेश असेल. त्याचा उपयोग सुरुवातीला गटाच्या कामकाजासाठी केला जाईल.


अदानी ग्रुप विमानतळ क्षेत्रातही - 
खरंतर अदानी समूह बंदरे आणि विमानतळ यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतलेला आहे, त्यांना व्यावसायिक वाहनांची आवश्यकता आहे. या उद्देशासाठी, कंपनी प्रथम आपले उत्पादन वापरेल. यासोबतच ते बॅटरीचे उत्पादन करणार असून देशभरात चार्जिंग स्टेशनही उभारणार आहे.


हरित प्रकल्पावर लक्ष केंद्रित - 
अदानी समूह ग्रीन प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यांचे नवीन फोकस क्षेत्र याभोवती असेल. समूहाने अलीकडेच ग्रीन हायड्रोजन उत्पादनांसाठी नवीन उपकंपनी स्थापन केली आहे. यामध्ये कमी कार्बन वीज आणि पवन टर्बाइनची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये सोलर मॉड्युल आणि बॅटरी देखील बनवल्या जाणार आहेत. जी जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा कंपन्यांपैकी एक असेल.


$70 अब्ज गुंतवणूक - 
अदानी समूहाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नवीन ऊर्जा व्यवसायात ७० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले होते. ही रक्कम पुढील दहा वर्षांत खर्च करण्यात येणार आहे. समूहाकडे मजबूत पायाभूत फोकस आहे आणि गुजरातमधील मुंद्रा येथे विशेष आर्थिक क्षेत्रात संशोधन आणि विकास केंद्र स्थापन करण्याची त्यांची योजना आहे. याद्वारे इलेक्ट्रिक मोबिलिटीवर भर दिला जाणार आहे. अदानी या क्षेत्रात थेट टाटा आणि रिलायन्सशी स्पर्धा करेल. या दोन्ही गटांनी या क्षेत्रात उतरण्याची तयारी केली आहे.