मुंबई: अदानी समूह आता 200 अब्ज डॉलर्स मार्केट कॅपिटलायझेशन (market capitalisation) होणारा भारतातील तिसरा उद्योग समूह बनला आहे. या ग्रुपच्या सात लिस्टेड कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे शेअर्स ऑल टाईम हाय असल्याने अदानी समुहाने ही किमया केल्याचं स्पष्ट आहे. टाटा आणि रिलायन्स ग्रुपचे भांडवल हे अदानी समुहापेक्षा जास्त आहे. 

या वर्षी दमदार रिटर्नअदानी समुहातील अदानी पॉवरमध्ये 157 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 50 टक्के, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 67 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 51 टक्के, अदानी पोर्ट्स अँड सेजमध्ये 17 टक्के आणि अदानी एंटरप्रायझेसमध्ये 28 टक्क्यांनी वाढ झाल्याने या शेअर्समधून मोठ्या प्रमाणात रिटर्न्स मिळाले आहेत. 

टाटा ग्रुप नंबर एक तर रिलायन्स दुसऱ्या क्रमांकावरबीएसई डाटा (BSE data) माहितीनुसार, अदानी समुहाच्या सात लिस्टेड कंपन्यांचे भागभांडवल हे एकूण 201 अब्ज डॉलर्स इतकं झालं आहे. भारतात सर्वाधिक भागभांडवल हे टाटा ग्रुपचं असून ते 320 अब्ज डॉलर्स इतकं आहे. तर रिलायन्स ग्रुपचे सध्याचं भांडवल हे 237 अब्ज डॉलर इतकं आहे. 

अदानी समुहाच्या पाच कंपन्यांचे भांडवल हे 1 लाख कोटी रुपयांहून जास्त आहे. तर अदानी पॉवर आणि अदानी विलमर या दोन कंपन्यांचे भांडवल हे अनुक्रमे 98 हजार आणि 82 हजार कोटी रुपये इतकं आहे. 

गेल्या काही महिन्यांमध्ये अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या समुहाच्या व्यवहारांमध्ये सातत्य राहिलं आहे. याचा परिणाम भविष्यातही कायम राहणार असल्याचं चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या: