Adani Group Share Price : अदानी समुहातील अदानी विल्मर आणि अदानी पॉवर या कंपन्याच्या शेअर्सला लगाम लागला आहे. मागील काही दिवसांपासून हे दोन्ही शेअर्स तेजीत होते. मात्र, आज या दोन कंपन्यांना नफा वसुलीचा फटका बसला. मागील काही दिवसांपासून या दोन शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागत होते. त्यानंतर आज गुंतवणुकदारांनी नफा वसुली करण्यास सुरुवात केली.
अदानी विल्मरच्या शेअरने गुरुवारी चांगली सुरुवात केली. शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर या शेअरचा दर आधीच्या दराच्या तुलनेत 5 टक्क्यांनी वधारला होता. सलग सहाव्या दिवशी अदानी विल्मरच्या शेअरला सहाव्या दिवशी अप्पर सर्किट लागेल अशी चिन्हं होती. मात्र, दुपारनंतर अचानकपणे शेअरमध्ये नफा वसुली सुरू झाली. त्यामुळे या शेअरमध्ये वेगाने घसरण सुरू झाली. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास हा स्टॉक लोअर सर्किटसह 5 टक्क्यांनी घसरून 578.75 रुपयांवर आला.
अदानी पॉवरमध्येही असेच चित्र दिसून आले. अदानी पॉवरच्या या शेअरला मागील चार दिवसांपासून अप्पर सर्किट लागत होते. आज व्यवहार सुरू झाल्यानंतरही शेअरला अप्पर सर्किट लागले होते. बुधवारच्या तुलनेत या शेअरमध्ये 5 टक्क्यांची उसळण दिसून आली. हा शेअर दर 256.70 रुपयांवर पोहचला होता. हा 52 आठवड्यातील उच्चांक आहे. त्यानंतर अदानी पॉवरमध्ये नफा वसुली सुरू झाली. या शेअरमध्ये 5 टक्क्यांनी घसरण होत 232.30 रुपयांवर आला. बुधवारी हा स्टॉक 244.50 रुपये या शेअर दरावर बंद झाला होता.
अदानी विल्मर हा अदानी समुहातील सातवा शेअर आहे. अदानी विल्मर हा स्टॉक फेब्रुवारी 2022 मध्ये लिस्ट झाला होता. आतापर्यंतच्या या शेअर दरात दुप्पट वाढ झाली. या स्टॉकने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला आहे. तर, अदानी पॉवरही मागील काही दिवसांपासून वधारला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Share Market : सलग तिसऱ्या सत्रात शेअर बाजारात घसरण; Sensex 523 तर Nifty 153 अंकांनी घसरला
- India's Economy: 2023 मध्ये भारताचा विकास दर होईल 7.5 टक्के, जाणून घ्या काय आहे ADBचा अंदाज