Forbes Billionaires : बुधवारी फोर्ब्सने (Forbes)  2022 वर्षातील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जारी केली. यामध्ये टेस्लाचे (Tesla) सह प्रमुख एलन मस्क (Elon Musk) पहिल्या क्रमांकावर आहेत. तर  अमेझॉनचे सब संस्थापक जेफ बेजोस (Jeff Bezos) दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत. एलन मस्क यांची संपत्ती 16.59 लाख कोटी रुपये इतकी आहे. तर जेफ बेजोस यांची संपत्ती 12.95 लाख कोटी इतकी आहे.  


रिलायन्स उद्योगसमूहाचे (Reliance Industries) मुकेश अंबानी 6.87 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी दहाव्या क्रमांकावर आहेत. तर गौतम अदाणी 11 व्या क्रमांकावर आहेत.  फोर्ब्सच्या रिपोर्ट्सनुसार गौतम अदाणी यांची एकूण संपत्ती 6.50 लाख कोटी रुपये इतकी आहे. तसेच फोर्ब्सच्या रिपोर्ट्सनुसार, भारतामधील अब्जाधिशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.  


मागील दोन वर्षात जगभरात कोरोना महामारीने हाहाकार माजवला होता. अनेकांचे रोजगार व्यवसाह बुढाले, अनेकांना आपला जीव गमवावा लागला. सर्वकाही ठप्प होत, त्यामुळे प्रत्येक देशाची आर्थव्यवस्था ढासशली आहे. पण अशा परिस्थितीतही भारतामध्ये अब्जाधिशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी  140 असणारी संख्या यंदा 166 इतकी झाली आहे. सर्वांची संपत्ती  57.58 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. जगभरातील एकूण अब्जाधिशांच्या संख्येत 87 ने घट झाल्याचे फोर्ब्सने सांगितले. जगातील अब्जाधिशांच्या संख्येत घट झाली असली तरीही भारतामधील अब्जाधिशांच्या संख्येत वाढ झाली आहे.  


फोर्ब्सच्या नवीन यादीत 2,668 लोकांचा समावेश आहे. यांची एकूण संपत्ती 12.7 ट्रिलियन डॉलर म्हणदेत 962.15 लाख कोटी  रुपये इतकी आहे. ही संपत्ती गतवर्षांपेक्षा 400 बिलियन डॉलर म्हणजेच 30.30 लाख कोटी रुपये कमी आहे. तर भारतामध्ये अब्जाधिशांच्या संख्येत आणखी  29 जणांचा समावेश झाला आहे. यामध्ये फाल्गुनी नायर यांचाही समावेश आहे.


संबंधित बातम्या :