Adani Share Price : मागील काही दिवसांपासून अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर दमदार कामगिरी करत आहेत. अदानी समूहातील तीन कंपन्यांच्या शेअर्सने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.  अदानी टोटल गॅस (Adani Total Gas), अदानी विल्मर ( Adani Wilmar) , अदानी पॉवर ( Adani Power) या तीन कंपन्यांच्या शेअर्सने उच्चांक गाठला आहे. 


अदानी टोटल गॅसच्या शेअर दरात जवळपास सहा टक्क्यांनी वाढ झाली. आज बाजार बंद झाला तेव्हा अदानी टोटल गॅसचा शेअर दर 2380 रुपये इतका झाला. फेब्रुवारी महिन्यात शेअर बाजारात लिस्ट झाला होता. कंपनीने नुकतीच इलेक्ट्रीक मोबिलिटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये उतरण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मागील सहा दिवसात कंपनीचा शेअर 16 टक्क्यांनी वधारला. मार्च महिन्यापासून या शेअर दरामध्ये एकूण सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानी टोटल गॅस कंपनीकडून पीएनजी आणि सीएनजी गॅसचा पुरवठा केला जातो. 


अदानी विल्मरच्या शेअरचा दर 570.50 रुपये इतका झाला. अदानी विल्मरने गुंतवणूकदारांना दोन महिन्याच्या कालावधीत दुप्पट रक्कम करून दिली. हा शेअर 250 रुपयांच्या आसपास हा शेअर बाजारात लिस्ट झाला. या कंपनीच्या अखत्यारीत असलेल्या फॉर्च्युन ब्रॅण्डचे खाद्य तेल व इतर उत्पादनांची विक्री केली जाते. भारतीय बाजारपेठेवर फॉर्च्युन कंपनीचे वर्चस्व आहे. 


अदानी पॉवरच्या शेअर उसळण दिसून आली. अदानी पॉवरच्या शेअरने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. अदानी पॉवरचा शेअर दर 212.50 रुपये इतका झाला. बाजार बंद झाला तेव्हा अदानी पॉवरचा शेअर 4.45 टक्क्यांनी वधारला. मागील काही दिवसांपासून अदानी शेअर चांगला उसळला आहे. गुंतवणूकदारांची चांगलीच कमाई होत आहे. 


शेअर बाजारात तेजी 


शेअर बाजारात आज दिवसभर तेजी राहिली. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स, निफ्टीत तेजी दिसून आली होती. बाजार बंद होताना ही तेजी कायम राहिली. सेन्सेक्स आणि निफ्टीत दोन टक्क्यांची वाढ दिसून आली. सेन्सेक्सने आज 60 हजार अंकाचा टप्पा ओलांडला. तर, निफ्टीने 18 हजारांचा टप्पा ओलांडला. 


एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाच्या बातमीने या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. आज बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 1,335.05 अंकांनी म्हणजे 2.25 टक्क्यांनी वधारला. सेन्सेक्स 60,611.74 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टीत 382.90 अंकांनी म्हणजे जवळपास 2.17 टक्क्यांनी वधारला. निफ्टी आज 18,053.40 अंकांवर बंद झाला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha