मुंबई: जागतिक बाजारात नकारात्मक संकेत मिळाल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 575 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 168 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.97 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,034 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.94 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,639 वर पोहोचला आहे. 


आज 1678 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1644 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 102 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 


आज बाजार बंद होताना फार्मा आणि रिअॅलिटी क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं आहे.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही घसरण झाली आहे. 


गुरुवारी शेअर बाजारात Adani Ports, Titan Company, HDFC, Power Grid Corp आणि ONGCL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून  Axis Bank, Divis Labs, HUL, Dr Reddy's Laboratories आणि ICICI Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.


या कंपन्यांचे शेअर्स वधारले



  • Axis Bank- 2.38 टक्के

  • Divis Labs- 1.40 टक्के

  • HUL- 1.06 टक्के

  • Dr Reddys Labs- 0.95 टक्के

  • ICICI Bank- 0.94 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • Adani Ports- 3.82 टक्के

  • Titan Company- 3.22 टक्के

  • HDFC- 2.89 टक्के

  • ONGC- 2.29 टक्के

  • Power Grid Corp- 2.24 टक्के


सुरुवात घसरणीने झाली
आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. जागतिक शेअर बाजारातून नकारात्मक संकेत मिळू लागल्याने भारतीय शेअर बाजारातही त्याचा परिणाम दिसून आला. निफ्टी 17800 अंकांखाली सुरू झाला. तर, सेन्सेक्समध्ये 300 अंकांची घसरण दिसून आली. सेन्सेक्स 59,309.42 अंकांवर सुरू झाला. निफ्टी 50 निर्देशांकातही 73.70 अंकांची घसरण दिसून आली. शेअर बाजारात नफा वसुली दिसून येत असल्याने ही घसरण होत असल्याचे म्हटले जात आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: