Garlic News : सध्या काही पिकांच्या दरात घसरण होत आहे. तर काही पिकांच्या दरात वाढ होत आहे.  सध्या देशात लसणाच्या (Garlic) मोठी वाढ झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये लसणाचे दर हे 400 रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे. याचा सर्सवामान्यांना फटका बसत असला तरी लसूण उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. मध्य प्रदेशात लसूण विकून अनेक शेतकरी श्रीमंत झाले आहेत. आज आपण अशाच एका तरुण लसूण उत्पादक शेतकऱ्याबद्दल माहिती पाहणार आहोत. या शेतकऱ्याने लसूण विकून 1 कोटी रुपये कमावले आहेत.


एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे शेती करणारा तरुण शेतकरी राहुल देशमुख यावेळी लसूण विकून श्रीमंत झाला आहे. त्यांनी 13 एकर जमिनीवर लसणाची लागवड केली होती. यासाठी जवळपास एकूण 25 लाख रुपयांचा खर्च आला. मात्र, लसूण विकून त्यांनी खर्चापेक्षा 5 पट अधिक नफा मिळवला. मी आतापर्यंत एक कोटी रुपयांचा लसूण विकल्याची माहिती देशमुख यांनी दिली. विशेष म्हणजे राहुल यांच्या शेतात लसणाचे पीक अजूनही आहे. 


लसणाच्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे 


राहुल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी शेतात सौरऊर्जेचा वापर केला असून, पिकांच्या सुरक्षिततेसाठी पोर्टेबल सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले आहेत. चार एकरात पिकवलेल्या लसूण पिकावर लक्ष ठेवण्यासाठी तीन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. दरम्यान, बदनूर, छिंदवाडा येथील रहिवासी असलेले दुसरे शेतकरी पवन चौधरी म्हणाले की, त्यांनी त्यांच्या 4 एकर लसूण पिकावर 4 लाख रुपये खर्च केले आणि 6 लाख रुपयांचा नफा कमावला. माझ्या शेतावर लक्ष ठेवण्यासाठी मी तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. आमच्या शेतात दोन कॅमेरे आहेत, तर एक कॅमेरा भाड्याने आहे. माझ्या शेतातून माझा लसूण चोरीला जात होता, त्यामुळे मला हे कॅमेरे लावावे लागल्याची माहिती शेतकऱ्याने दिली. 


लसणाच्या दरात मोठी वाढ


लसणाची वार्षिक किंमत साधारणतः 80 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचत असताना, या हंगामात त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. लसणाचे दर प्रतिकिलो 300 रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळं त्यांना भरघोस नफा झाला असून, लसणाच्या दरात एवढी मोठी वाढ झाल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. याआधी लसणाच्या भावाने एवढी अभूतपूर्व पातळी ओलांडली नव्हती. लसणाच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचेच नव्हे तर हॉटेल चालकांचे बजेटही बिघडले आहे. हॉटेल मालक डिशमध्ये लसणाचे प्रमाण कमी करु शकत नाहीत, कारण त्याचा चवीवर परिणाम होईल. अशा स्थितीत ग्राहकांच्या तक्रारी वाढतील. तसेच, आम्ही खाद्यपदार्थांच्या किमतीत बदल करू शकत नाही. अशा परिस्थितीत आमच्या नफ्याचे प्रमाण कमी होत असल्याची माहिती हॉटेल मालकांनी दिली.


महत्वाच्या बातम्या:


34 वर्षांच्या मेहनतीतून उभारली 67500 कोटींची कंपनी, शेतकरी कुटुंबातील उद्योगपतीची यशोगाथा