मुंबई :  उद्यापासून म्हणजे 1 जुलैपासून बँकिंग आणि कराशी संबंधित नियमात बदल होणार आहे. तसेच कार आणि बाईक खरेदी करणे  देखील महाग होणार आहे. उद्यापासून होणाऱ्या या बदलांचा सर्वसामान्य माणसाला फटका बसणार आहे. 


उद्यापासून होणारे  9 मोठे बदल



  • स्टेट बँक ऑफ इंडिया


बेसिक सेव्हिंग अकाउंट डिपॉजिट (BSBD) खातेधारकांना महिन्यातून 4 वेळा एटीएमचा वापर मोफत आहे. त्यानंतर एटीएमचा वापर केल्यास प्रत्येक वेळेला 15 रुपये आणि जीएसटी द्यावा लागणार आहे.तसेच चेकबुकसाठीही अधिक पैसे द्यावे लागणार आहेत.



  • आयडीबीआय बँक


1 जुलैपासून चेक लीफ चार्ज, सेव्हिंग अकाउंट चार्ज आणि लॉकर चार्जमध्ये बदल करण्यात आला आहे. सेमी अर्बन आणि ग्रामीण भागातील खातेधारक आता बँकेत फक्त 5 वेळाच पैसे जमा करू शकणार आहेत. पूर्वी ही सुविधा 7 -10 वेळा उपलब्ध होती. तसेच ग्राहकांना आता 20 पानांचेच चेकबुक मोफत दिले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक चेकसाठी 5 रुपये द्यावे लागणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे महिन्याला सरासरी 10 हजार रक्कम बॅलन्स असेल तर त्याला लॉकरवर डिस्काउंट दिला जाणार आहे.



  • सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना  नवा IFSC कोड


सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाल्याने आता या बँकेच्या ग्राहकांना नवा IFSC कोड वापरावा लागणार आहे



  • प्रत्येक दागिन्याला आता यूनिक ओळख


आधारच्या धर्तीवर सोन्याच्या प्रत्येक दागिन्याची यूनिक ओळख तयार करणार आहे. दागिने हरवल्यास वा चोरी झाल्यास त्याची ओळख पटावी म्हणून प्रत्येक दागिन्याला आता यूनिक ओळख (यूआईडी) दिली जाणार आहे. 



  • LPG गॅसच्या किंमतीत बदल 


दर महिन्याच्या सुरूवातीला LPG गॅसच्या किंमतीत बदल होतो. त्यामुळे उद्या LPG गॅसच्या  किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. 



  •  स्मॉल सेव्हिंग स्कीमचे व्याजदरात बदल


स्मॉल सेव्हिंग स्कीमचे व्याजदर कमी होऊ शकतात. यात PPF, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, मंथली इनकम स्कीम, टाइम डिपॉजिट आणि रिकरिंग डिपॉजिट स्कीमचा समावेश आहे.



  • मारुती आणि हिरोच्या गाड्यांच्या किमती वाढणार


मारुती आणि हिरोच्या गाड्यांच्या किंमती वाढणार असून हीरोच्या दुचाकींच्या एक्स-शो रूम किमतीत तीन हजार रुपयांची वाढ होऊ शकते.



  • 50 लाखांच्या वरील खरेदीवर टीडीएस कापला जाणार


आयकर अधिनियमाच्या सेक्शन-194 मध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार त्यानुसार 50 लाखांच्या वरील खरेदीवर 0.10 टक्के टीडीएस कापला जाणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या व्यावसायिकाचा गेल्या वर्षी 10 कोटींचा टर्नओव्हर झाला असेल तर तो यावर्षी 50 लाखांच्या वर माल खरेदी करू शकेल. यावर जी विक्री होईल त्यावर टीडीएस कापला जाईल. आयकर अधिनियमाचे 206 एबी सेक्शन १ जुलैपासून लागू होणार आहे. यामुळे जर एखाद्या विक्रेत्याने दोन वर्ष रिटर्न फाईल केले नाही तर त्याला 5 टक्के टीडीएस द्यावा लागेल. पूर्वी 0.10 टक्के टीडीएस होता. त्यात आता 50 टक्के वाढ करण्यात आली आहे.



  • लर्निंग लायसेंससाठी ऑनलाइन अर्ज


लर्निंग लाइसेंस बनवण्यासाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर घरातूनच चाचणी दिली जाऊ शकणार आहे. चाचणीत पास झाल्यानंतर लर्निंग लायसन्स घरी पाठवून दिले जाणार आहे. परमर्नंट लायसेंससाठी मात्र ट्रॅकवर वाहन चालवून दाखवावे लागणार आहे.