7th Pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 7 व्या वेतन आयोगांतर्गत सरकारने 3 टक्के महागाई भत्ता (डीए वाढ) जाहीर केला होता. जुलै महिन्यात सरकार पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार आहे, मात्र त्याआधी सरकारने 5 व्या आणि 6 वा वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मोठी भेट दिली आहे. सरकारने त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे.


महागाई भत्ता 13% ने वाढला


कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 13 टक्के वाढ करण्यात आली आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या खात्यात नवीन डीएनुसार पगार या महिन्यापासून जमा होत आहे.


किती रुपयांनी वाढला महागाई भत्ता 


सध्या असे अनेक कर्मचारी आहेत, ज्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत नाही, त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन सरकारने हे विशेष पाऊल उचलले आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 5व्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डीए 381 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.


3 महिन्यांची थकबाकी मिळेल


याशिवाय सहाव्या वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल बोलायचे झाले, तर त्यांचा डीए 196 टक्क्यांवरून 203 टक्के होईल. यामध्ये सरकारने डीएमध्ये 7 टक्के वाढ केली आहे. जानेवारी 2022 पासून कर्मचाऱ्यांना वाढीव डीएचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. यासोबतच त्यांना 3 महिन्यांच्या थकबाकीचाही लाभ मिळणार आहे.


संबंधित बातम्या: