Mango Farmers success story : दरवर्षी उन्हाळ्यात आंब्याचा हंगाम (Mango Season) असतो. या काळात मोठ्या प्रमाणात आंब्याची उलाढाल होते. अनेक असे शेतकरी (Farmers) आहेत, की ज्यांच्या शेतात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे (Mango) आहेत. या माध्यमातून ते चांगला नफा कमावत आहेत. आज आपण अशीच एक यशोगाथा (success story) पाहणार आहोत. एका 74 वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतात 200 प्रकारच्या आंब्याची लागवड केलीय. मुशीर हसन खान (Mushir Hasan Khan) असं शेतकऱ्याचं (Farmers) नाव आहे. ते उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरच्या बावर गावातील रहिवासी आहेत. आंबा पिकातून ते दरवर्षी लाखो रुपयांचा नफा कमावत आहेत.


दरवर्षी सुमारे 500 क्विंटल आंब्याचे उत्पादन


शाहजहांपूरच्या बावर गावातील शेतकरी मुशीर हसन खान यांच्या शेतात 200 हून अधिक प्रकारच्या रंगीबेरंगी आंब्यांची बाग आहे. ते बागेतून ते वर्षाला लाखो रुपये कमवत आहेत. त्यांच्या आंब्याना देश-विदेशात मोठी मागणी आहे.  आम्ही गेल्या चार पिढ्यांपासून आंब्याची लागवड करत आहोत. दरवर्षी सुमारे 500 क्विंटल आंब्याचे उत्पादन होते.


सर्वाधिक लक्ष दशेहरी आंब्यावर 


मुशीर चाचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात आम्ही दरवर्षी 200 विविध प्रकारच्या आंब्याचे उत्पादन घेतो. आंब्याच्या अनेक जाती आहेत. दशेहरी, चौसा, लंगडा, मल्लिका, तोतापरी, हापूस, सिंधुरा, बंगीनापल्ली, रत्नागिरी, रासपरी, मालदा अशा विविध प्रकारचे आंबे पिकतात. मात्र, सर्वाधिक लक्ष दशेहरी आंब्यावर आहे. कारण त्याचे उत्पादन येथे अधिक आहे. आंब्याची बहुतांश विक्री ही राजस्थानमध्ये केली जाते. काही व्यापारी शेतात आंब्याचा व्यवहार करतात.


आंब्याला मिळतोय 25 ते 30 रुपये किलोचा दर 


5 ते 10 जून दरम्यान अनेक जातीचे आंबे बाजारात येतात. आमच्या शेतातील आंबे खूप चागले आहेत. देशातील अनेक राज्यांतून आपल्या आंब्याला हंगामात सर्वाधिक मागणी असल्याची मुशीर चाचा यांनी सांगितलं. आतापर्यंत आंब्याला 25 ते 30 रुपये किलोचा दर मिळाला आहे. मात्र, यंदा हा आंबा काहीसा महाग होणार आहे. 


शेतात  शुगर फ्री अंबिका आंब्याचीही लागवड 


मुशीर चाचा यांनी आपल्या शेतात शुगर फ्री अंबिका आंब्याची लागवड केली आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी अंबिका आंब्याचे सेवन फायदेशीर ठरते. या आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही दिवसभरात कितीही आंबे खाल्ले तरी तुमची शुगर लेव्हल एक टक्काही वाढणार नाही. आंबा फळांवर रोग व किडींचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, हे टाळण्यासाठी, क्विनालफॉस किंवा क्लोरपायरीफॉस 2 एमएल प्रति लिटर किंवा इमेक्टिन बेंझोएट 0.5 मिलीग्राम या प्रमाणात सकाळ संध्याकाळ फवारणी करावी.


महत्वाच्या बातम्या:


8 वी पास शेतकऱ्याचा प्रताप, आंबा पिकातून साधली आर्थिक प्रगती, वर्षाला कमवतोय लाख रुपये