Mr And Mrs Mahi Box Office Collection Day 2 : राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांचा 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' (Mr And Mrs Mahi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. क्रिकेट आणि रोमान्स असलेल्या या चित्रपटाला 'सिनेमा लव्हर्स डे'चा खूप फायदा झाला. मोठ्या संख्येने प्रेक्षक हा चित्रपट पाहायला सिनेमागृहात गेले. राजकुमार राव आणि जान्हवी कपूरच्या या चित्रपटाने ओपनिंग डेला 6.8 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं. रिलीजच्या दुसऱ्या दिवशीही 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' बॉक्स ऑफिसचं मैदान गाजवताना दिसून आला.
'मिस्टर अॅन्ड मिसेज माही'चं कलेक्शन किती?
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, मिस्टर अॅन्ड मिसेज माही या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 4 ते 5 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही'ने रिलीजच्या दोन दिवसांत 11 ते 12 कोटींचा गल्ला जमवला आहे. आयपीएल आणि लोकसभा निवडणुकीचा बॉलिवूडला मोठा फटका बसला होता. अशातच आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करताना दिसून येत आहे.
राजकुमार राव आणि जान्हवी कपूरच्या 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' या चित्रपटात क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या एका जोडप्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. राजकुमारने महेद्रचं पात्र साकारलं आहे. तर जान्हवीच्या पात्राचं नाव महिमा आहे. लग्नानंतर दोघेही आपल्या क्रिकेटच्या प्रवासाची सुरुवात करतात. एक अयशस्वी क्रिकेटर आपल्या पत्नीचं स्वप्न साकार करण्यासाठी कसा पाठिंबा देतो ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. चित्रपटात क्रिकेटसह रोमान्सदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 'रुही'नंतर मिस्टर अॅन्ड मिसेज माही या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जान्हवी कपूर आणि राजकुमार राव स्क्रिन शेअर करताना दिसले आहेत.
'मिस्टर अँड मिसेस माही'चे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, एक अयशस्वी क्रिकेटर राहिलेला राजकुमार राव आपल्या पत्नीला, जो उत्तम क्रिकेट खेळतो आणि व्यवसायाने डॉक्टर आहे, तिला मोठा क्रिकेटर बनवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. राजेश शर्मा आणि जरीना वहाब देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत.
संबंधित बातम्या