Success Story: भारतात (India) अनेकजण अब्जाधीश उद्योगपती आहेत. अनेक व्यावसायिकांना वारसाहक्कानं प्रचंड व्यावसायिक साम्राज्य मिळालं तर काहींनी स्वतःहून करोडो आणि अब्जावधी रुपयांचे व्यवसाय उभे केले आहेत. आज आपण देशातील एका अशा उद्योगपतीबद्दल माहिती पाहणार आहोत, जे एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले आहेत. मोठ्या मेहनतीने त्यांनी 67500 कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. विशेष म्हणजे देशातील या दिग्गज उद्योगपतीने 34 वर्षांच्या मेहनतीनंतर हे स्थान मिळवले आहे. 


अभियांत्रिकी आणि बांधकाम व्यवसायातील सर्वात श्रीमंत व्यक्ती


पीपी रेड्डी (PP Reddy) हे एक अभियंता आहेत. ते भारतातील बांधकाम व्यवसायाशी संबंधित व्यावसायिक आहेत. पीपी रेड्डी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. फोर्ब्स मासिकानुसार त्यांची एकूण संपत्ती 16,591 कोटी रुपये आहे. त्याचवेळी, 360 वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 नुसार, ते अभियांत्रिकी आणि बांधकाम व्यवसायातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.


शेतकरी कुटुंबातील उद्योगपती 


विशेष बाब म्हणजे पीपी रेड्डी यांना वारसाहक्काने काहीही मिळालं नाही, त्यांनी हे व्यवसाय साम्राज्य स्वबळावर उभे केले आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पीपी रेड्डी यांच्या यशाची आणि संघर्षाची कहाणी लाखो तरुणांना प्रेरणादायी आहे. पीपी रेड्डी यांच्या कुटुंबाचा व्यवसायाशी काहीही संबंध नव्हता. 1989 मध्ये रेड्डी यांनी काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला आणि दोन कर्मचाऱ्यांसह मेघा इंजिनिअरिंग एंटरप्रायझेसची स्थापना केली. गेल्या 34 वर्षांत, पीपी रेड्डी यांच्या कंपनीची झपाट्याने वाढ झाली आहे. ती भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये सूचिबद्ध झाली आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर (MEIL) चे मार्केट कॅप 67,500 कोटी रुपये आहे.


छोटीशी सुरुवात, आज कोट्यवधींचा व्यवसाय


पीपी रेड्डी यांच्या कंपनीनं सुरुवातीला छोटे पाईप बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. यानंतर कंपनीने भारतातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प उभारला. यानंतर कंपनीने मोठे पायाभूत प्रकल्प उभारण्यात एक प्रमुख म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पीपी रेड्डी यांच्या कंपनीने भारतातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प उभारला आहे. कल्लेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प तेलंगणामध्ये 14 अब्ज डॉलर्स खर्चून बांधला गेला. गोदावरी नदीवर बांधलेल्या या प्रकल्पामुळे 13 जिल्ह्यांतील 18.26 लाख एकर जमीन सिंचनाखाली येते. पीपी रेड्डी हे हैदराबादमधील ‘डायमंड हाऊस’ या आलिशान बंगल्यात राहतात. पीपी रेड्डी यांचा खासगी गोल्फ कोर्स देखील आहे.


महत्वाच्या बातम्या:


कर्ज घेऊन व्यवसायाची सुरुवात, आज 17 हजार कोटींच्या कंपनीचे मालक; TS कल्याणरामन यांची यशोगाथा