Gold Fraud Incident News : देशात अनेक ठिकाणी पर्यटकांची फसवणूक झाल्याच्या बातम्या तुम्ही एकल्या असतीलच. अशीच एक फसवणुकीची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्येही (Jaipur of Rajasthan) फसवणुकीची घटना घडली आहे. एका अमेरीकेच्या महिलेची (American woman) कोट्यावधी रुपयांची फसवणूक एका दुकानदाराने केली आहे. या घटनेची सध्या सर्वच स्तरात जोरदार चर्चा सुरु आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.  


नेमकी काय घडली होती घटना?


राजस्थानच्या जयपूरमध्ये महिलेची मोठी फसवणुक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथील एका दुकानदाराने एका अमेरिकन महिलेला गंडा घातला आहे. चेरीश नावाच्या अमेरिकन महिलेची फसवणूक झालीय. ती दोन वर्षांपूर्वी भारतात पर्यटनाला आली होती. जयपूरची सफर करताना एका सुवर्ण पेढीतील दागिना तिला आवडला होता. यावेळी चेरीशने तो दागिने खरेदी करण्याचं ठरवलं. या दागिन्यांची किंमत होती तब्बल 6 कोटी रुपये सांगितली होती. अखेर चेरीश ते दागिने  खरेदी करुन अमेरिकेला गेली. मात्र तिकडे गेल्यावर मौल्यवान रत्नं असलेले ते दागिने खोटे असल्याचे समजल्यावर चेरीशला धक्का बसला. कारण 6 कोटी रुपयांना घेतलेले ते दागिने फक्त 300 रुपयांचे होते. 


फसवणूक करणारे व्यापारी पिता-पुत्र फरार


दरम्यान, चेरीशने ज्या ठिकाणी हा दागिना खरेदी केला होता, तेथील माहिती घेतली असता, तिची फसवणूक करणारे व्यापारी पिता-पुत्र हे पळून गेले आहेत. चेरीशची फसवणूक करणाऱ्या या दोघांनी जयपूरमधील उच्चभ्रू वस्तीत 3 कोटी रुपये खर्चून एक फ्लॅट विकत घेतल्याचीही चर्चा आहे. आता पोलिसांनी पळून गेलेल्या सुवर्ण व्यापाऱ्यांवर लूक आऊटची नोटीस काढली आहे. पोलीस या घटनेत फसवणूक करणाऱ्या पुत्रांचा शोध घेत आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


अहमदनगरमधील राहुरी जिल्हा बँकेच्या शाखेत अडीच कोटींचे बनावट सोने तारण उघडकीस, चौकशी सुरु