Credit Card Rules Changed: सरकारने अलीकडेच परकीय चलन व्यवस्थापन नियम 2000 चा नियम 7 रद्द केला आहे. त्यामुळे, 1 जुलै 2023 पासून परकीय चलनात क्रेडिट कार्डच्या वापरावर 20 टक्के TCS (Tax Collection Source) आकारला जाणार आहे. म्हणजेच, जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे परकीय चलनात व्यवहार केले तर तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. अगदी छोट्या छोट्या व्यवहारांसाठीही तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.


काय आहे नियम 7?


परकीय चलन व्यवस्थापन (चालू खाते व्यवहार) नियम, 2000 चा नियम 7 दोन दशकांपूर्वी लागू करण्यात आला होता. परकीय चलनात क्रेडिट कार्डचा वापर वाढवणे हा त्याचा उद्देश होता. लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत परदेशातील कोणतीही व्यक्ती प्रति व्यक्ती $2.5 लाख खर्च करू शकते. यामध्ये अभ्यास, वैद्यकीय आणि गुंतवणूक यांचा समावेश आहे.


टीसीएसचा तुमच्यावर कसा होईल परिणाम?


टीसीएस (TCS) अशा व्यक्तीवर देखील परिणाम करेल जो भारतात आहे, परंतु परदेशी वेबसाइटवर किंवा क्रेडिट कार्डवर परदेशी चलन खर्च करत आहे, तर अशावेळी देखील 20 टक्के टीसीएस (TCS) लादला जाईल. याशिवाय तुम्ही परदेशात जाऊन क्रेडिट कार्ड वापरता, तेव्हा त्यावरही तुम्हाला 20 टक्के टीसीएस भरावा लागेल.


परदेशी शिक्षण/परदेशातील अभ्यासावरील कोणताही बदल झालेला नाही. अर्थ मंत्रालयाने 18 मे रोजी जारी केलेल्या स्पष्टीकरणानुसार, 1 जुलैपासून परदेशात अभ्यासासाठी जाणाऱ्यांच्या रकमेवर जुना टीसीएस (TCS) दर लागू राहील. टीसीएस (TCS) दर आणि सूट मर्यादेचे तपशील खालीलप्रमाणे आहेत.


1 जुलैपासून शिक्षण निधीवरील टीसीएस दर:


1. जर तुम्ही कोणत्याही बँकेकडून शैक्षणिक कर्जाच्या मदतीने परदेशात अभ्यासासाठी पैसे पाठवत असाल, तर 7 लाख रुपयांपर्यंत कोणतेही टीसीएस (TCS) लागू होणार नाही. 1 जुलै 2023 पासून, टीसीएस (TCS) दर 7 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर फक्त 0.5% असेल. यापूर्वीही हाच दर आणि मर्यादा लागू होती.


2. जर तुम्ही बँकेकडून कर्ज न घेता परदेशात अभ्यासासाठी पैसे पाठवत असाल, तर 7 लाख रुपयांपर्यंत कोणतेही TCS लागू होणार नाही. 1 जुलै, 2023 पासून, TCS दर 7 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर 5% असेल. हाच दर आणि मर्यादा याआधीही लागू होती.


दरम्यान, सरकारने विदेशी टूर पॅकेज (Foreign Tour Package) बुक करणे आणि बाँड, शेअर्स (Shares), रिअल इस्टेट (Real Estate), भेटवस्तू (Gifts) इत्यादींच्या खरेदीच्या उद्देशाने उदारीकृत रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत आकारला जाणारा टीसीएस (TCS) दर सुधारित केला आहे. तथापि, वैद्यकीय उपचारांसाठी टीसीएस (TCS) दरात कोणताही बदल झालेला नाही.






हेही वाचा:


मोठी बातमी! 2000 नोटा चलनातून बंद होणार, 30 सप्टेंबरपर्यंत वापरता येणार