Currency News Today India : केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर नोटांच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. तुमच्याकडेही 100 रुपयांची नोट असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. तुमच्याकडे असलेली 100 रुपयांची नोट ही 'लाख'मोलाची ठरू शकते.


जाणून घ्या काय आहे नोटेची वैशिष्ट्ये?


तुमच्याकडे असलेल्या 100 रुपयांच्या नोटेमधून तुम्ही चांगली कमाई करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या तुम्हाला कमाई करता येणार आहे. तुमच्याकडे 786 या क्रमांकाच्या मालिकेतील 100 रुपयांची नोट असेल तर तुम्ही चांगली कमाई करू शकता. सध्या 786 क्रमांकाच्या नोटेला चांगली मागणी आहे. हा क्रमांक असलेली नोट विकून तुम्ही चांगली कमाई करू शकता. 


कुठं करता येईल विक्री?


जर तुमच्याकडे 786 सीरीजच्या नोट्स असतील तर तुम्ही त्या Ebay वर विकू शकता. याशिवाय, तुम्ही olx सारख्या इतर अनेक वेबसाइटवर अशा विशेष नोट्ससाठी बोली लावू शकता.


फोटो कसा अपलोड करणार?


नोट विकण्यासाठी तुम्हाला www.ebay.com वर लॉग इन करावे लागेल. यानंतर, तुम्हाला होमपेजवर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल. येथे तुम्हाला विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागेल. आता तुमच्याकडे असलेल्या विशेष नोटचा फोटो वेबसाइटवर अपलोड करावा लागेल. याशिवाय तुम्ही येथे जुन्या नाण्यांसाठीही बोली लावू शकता. 


खरेदीदार तुम्हाला देईल ऑफर 


फोटो अपलोड केल्यानंतर, तुमची नोट खरेदी करण्यास इच्छुक असलेले सर्व लोक तुम्हाला ऑफर देतील. याशिवाय, तो तुमच्या नंबरवर तुमच्याशी संपर्क साधेल. याशिवाय, तुम्ही त्यांच्याशी व्यवहारासाठी चर्चादेखील करू शकता. 


अनेक वेबसाइट्सवर संधी उपलब्ध


यावेळी अनेक ई-कॉमर्स वेबसाइट्स तुम्हाला कमाईची संधी देत ​​आहेत. वेबसाइटवर नोटांच्या खरेदी-विक्रीचे अधिकार आरबीआयने कोणत्याही कंपनीला दिलेले नाहीत. तर, तुम्ही पूर्ण पडताळणी केल्यानंतरच खरेदी किंवा विक्री करावी.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha