एक्स्प्लोर

९४% विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, आघाडीच्या कंपन्यांचे सहकार्य: के जे सोमय्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग, सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीच्या २०२५ च्या यशस्वी प्लेसमेंटवर एक नजर

के जे सोमय्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंगने २०२५ च्या प्लेसमेंटमध्ये ९४% विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळवून दिली. १४६ हून अधिक आघाडीच्या कंपन्यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना आकर्षक करिअरच्या संधी दिल्या.

मुंबई, महाराष्ट्र: सध्या नोकऱ्यांची परिसंस्था अत्यंत स्पर्धात्मक होत असताना विद्यार्थ्यांचे करिअर कसे घडते हे विद्यापिठांच्या यशाचे एक महत्त्वाचे मानक बनले आहे. उद्योगक्षेत्रांना तांत्रिक तज्ज्ञतेसोबतच भविष्यसाठी कौशल्यांनी सज्ज असे पदवीधर हवे असतात. त्यामुळे उच्चशिक्षण देणाऱ्या संस्था निव्वळ शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे नव्हे तर अर्थपूर्ण रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या क्षमतेवरही जोखल्या जातात. विद्यार्थ्यांच्या यशासंदर्भातील आपली बांधिलकी अधोरेखित करत के जे सोमय्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग, सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी (एसयूव्ही) ने २०२५ मध्ये प्लेसमेंटच्या संदर्भात दमदार कामगिरी करत उद्योगक्षेत्रांसाठी सुयोग्य शिक्षण आणि करिअर सज्जता जपणारी आघाडीची संस्था ही आपली ओळख अधोरेखित केली आहे.

२०२५ च्या प्लेसमेंटमध्ये विविध क्षेत्रांमधील दमदार कंपन्यांचा सहभाग होता. भरतीच्या या प्रक्रियेत १४६ हून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदवला तर विद्यापिठाच्या खास प्लेसमेंट उपक्रमाच्या माध्यमातून ३६० विद्यार्थ्यांना संधी मिळाली. उत्तम शिक्षणासोबत अनुभवात्मक शिक्षण, उद्योगक्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य विकास यांची सांगड घालत विद्यार्थ्यांना बदलत्या व्यावसायिक जगासाठी सज्ज करण्याचा एसव्हीयूचा एकात्मिक शैक्षणिक दृष्टिकोन या यशातून दिसून येतो.

या प्लेसमेंट कार्यक्रमातील ठळक बाब म्हणजे तंत्रज्ञान, कन्सल्टिंग, बँकिंग, वित्त सेवा, अॅनालिटिक्स आणि उत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचा सहभाग. गुगल, गोल्डमॅन सॅक्स, जेपीमॉर्गन, एडलवाईस, आयओएन ग्रूप, ब्रोवरस्टॅक, नोरिऑन केमिकल्स, बार्कलेज, डेलॉइट, ईवाय, एलटीआयमाइंडट्री, टीसीएस, अॅक्सेंचर, इन्फोसिस, कॉग्निझंट, एचएसबीसी, कॅपजेमिनी, टाटा पॉवर, गोदरेज इंडस्ट्रीज आणि अशा अनेक आघाडीच्या आणि जागतिक पातळीवर ख्यातनाम अशा कंपन्यांनी उपक्रमात सहभाग नोंदवला. या विद्यापिठातील विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि शैक्षणिक परिसंस्थेवर उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांना विश्वास वाटतो हेच या बहूविध कंपन्यांच्या सहभागातून स्पष्ट झाले आहे.

नोकरीची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येसोबतच या प्लेसमेंटमधून विद्यार्थ्यांना मिळालेल्या संधीचा दर्जाही या प्लेसमेंटमधून अधोरेखित झाला आहे. केजेएसएसईने ५१.७२ लाख प्रतिवर्ष असे सर्वाधिक पॅकेज नोंदवले आहे. तर सरासरी हा आकडा ८.६३ लाख रु. प्रतिवर्ष आणि मध्यम स्तरावर ७.५ लाख रु. प्रतिवर्ष असा आहे. विविध क्षेत्रात पदवीधरांसाठी दमदार मागणी असल्याचे यातून स्पष्ट होते. दमदार प्रगतीसाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासोबतच विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात अर्थपूर्ण पद्धतीने काम करता यावे यासाठी ही संस्था विद्यार्थ्यांना योग्य दिशा देत आहे, हेच या यशातून स्पष्ट झाले आहे.

करिअरमध्ये प्रगती करता यावी यासाठी विद्यापिठातर्फे सर्वसमावेशक दृष्टिकोन बाळगला जातो, हे या यशाचे गमक आहे. नियोजित प्रशिक्षण कार्यक्रम, कोडिंग कौशल्य विकास, अॅप्टिट्यूड सुधारण्यासाठीची सत्रे, मॉक इंटरव्ह्यू, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, इंडस्ट्री प्रोजेक्ट्स आणि इंटर्नशीप या माध्यमातून विद्यार्थ्यांना सातत्याने त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत मार्गदर्शन लाभते. यामुळे समस्यांचा निपटारा, संवादकौशल्य आणि बदलांचा अंगीकार अशी कौशल्ये बाणवणे विद्यार्थ्यांना शक्य होते. ही कौशल्ये सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या व्यावसायिक क्षेत्रात फार महत्त्वाची ठरत आहेत.

हे विद्यापीठ प्रयोगशील शिक्षणावर आणि उद्योगक्षेत्रांच्या सहभागावर भर देत रोजगार क्षमता अधिक वृद्धिंगत करते. कॉर्पोरेट भागीदारांसोबतचे सहकार्य आणि अभ्यासक्रमात प्रत्यक्ष शिक्षणाचा सहभाग यावर भर देत विद्यार्थ्यांना करिअरला सुरुवात करण्यापूर्वी प्रत्यक्ष जगाचा अनुभव आणि माहिती मिळेल याची खातरजमा एसव्हीयूकडून केली जाते. पदवीधरांना आपल्या नवीन आयुष्याला सहजगत्या सुरुवात करता यावी यात अभ्यासक्रम आणि उद्योगक्षेत्रांची ही सांगड फार महत्त्वाची ठरते.

या यशाबद्दल एसव्हीयूच्या केजेएसएसईचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर आणि युनिव्हर्सिटी प्लेसमेंटचे अध्यक्ष श्री. विक्रांत वाघमारे म्हणाले,

“विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच वेगाने बदलणाऱ्या जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि आत्मविश्वासाने सज्ज करण्यावर सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही विश्वास ठेवतो. आमचे विद्यार्थी, शिक्षक, उद्योगक्षेत्रातील भागीदार आणि करिअर सर्विस टीमची बांधिलकी या प्लेसमेंट उपक्रमाच्या यशातून दिसली आहे. सर्व उद्योगक्षेत्रात नेतृत्व करण्यास, नाविन्यतेला चालना देण्यात आणि स्वत:ची छाप पाडण्यासाठी सज्ज असतील असे पदवीधर तयार करण्याची बांधिलकी आम्ही जपली आहे.”

तांत्रिक आधुनिकता, डिजिटल बदल आणि उदयोन्मुख उद्योगक्षेत्र यांचा रोजगार परिसंस्थेवर परिणम होत असताना भविष्यासाठी योग्य प्रतिभावान पिढी तयार करण्यात विद्यापिठांची भूमिका फार महत्त्वाची आहे. उद्योगक्षेत्रातील दृढ संबंध, विविध विषयांसाठीचे शिक्षण आणि विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवणारा दृष्टिकोन यातून सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी सातत्याने अशा संधी निर्माण करत आहे ज्यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांना उत्तम करिअर करता येईल आणि समाजाचे पांगही फेडता येतील.

आणखी एक यशस्वी प्लेसमेंट उपक्रम राबवून या विद्यापिठाने शैक्षणिक उत्कृष्टता, व्यावसायिक प्रगती आणि सातत्यपूर्ण शिक्षणाला चालना देण्याची आपली बांधिलकी जपली आहे. आपले विद्यार्थी फक्त पहिल्या नोकरीसाठी नही तर येणाऱ्या भविष्यात शाश्वत यश मिळवत राहतील, ही खातरजमा त्यांनी केली आहे.

Disclaimer: This is a sponsored article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.

आणखी वाचा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
Embed widget