Health Tips For Gym Lover : आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणासाठी आपल्या शरीराची, आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. स्वस्थ शरीर सुखी व उत्साही जीवनाचे आधार मानले जाते. संतुलित आहार, नियमित व्यायाम, उच्च अस्तित्व व्यवस्थापन आणि संतुलित मानसिक स्थिती यांची शिकार करून, आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपल्या जीवनात संतुलितता आणि सुख मिळवता येते. आपल्याला शरीर स्वस्थ आणि तंदुरुस्तीचं ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे, ज्यामुळे आपण सक्रिय आणि सतत जीवन जगू शकतो.
आपण नियमित पणे व्यायाम केला पाहिजे, परंतु अगदी खूप इंटेन्स जिम करण्याआधी, आपल्या शरीराच्या आवश्यकता लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. जिम करण्याचे आपल्या शरीरावर खूप सकारात्मक आणि नकारात्मक लाभ आणि परिणाम होऊ शकतात. जिम केल्यामुळे शरीराची क्षमता आणि ऊर्जा वाढते. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि स्वस्थ जीवनशैलीचे अनुसरण केल्यामुळे तोंडाची, पोटाची, शरीराची चर्बी कमी होते, मस्तिष्क/मेंदू उत्तम प्रकारे कार्य करतो आणि शरीराची अंतरंग संरचना सुद्धा बरोबर राहते.
जिम करताना आपल्या शरीराला कोणती गोष्ट कितपत आवश्यक आहे हे अगोदर आपण समजून घेतले पाहिजे. जसे काही वजन वाढीसाठी जिम करता तर काही वजन कमी करण्यासाठी, तसेच काहींची आवड असते जिम करणे तर काहींना बॉडीबिल्डिंग मध्ये आपले करिअर घडवायचे असते. वजन वाढविणारे weight gain supplements चा वापर करू शकतात आणि वजन कमी करणारे जेवणात योग्य आहार ठेवून वजन कमी करू शकतात.
तुमचे ध्येय बरोबर सेट करा
जिम करताना आपले ध्येय काय आहे याचा परिपूर्ण अभ्यास करणे अत्यंत गरजेचे असते. आपले ध्येय काय आहे आणि ते कसे पूर्ण करावे, किती वेळात करावे, किती दिवसात करावेतहे देखील गरजेचे आहे. आपण जिम का करत आहोत हे जर आपल्याला माहीत असेल तर त्यासाठी ध्येय लक्षात घेऊन योग्य नियोजन करणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही पटकन वजन वाढवू शकत नाही तसेच तुम्ही पटकन वजन घटवू शकत नाही. तुमची पोटाची, शरीराची चरबी देखील लगेच कमी होणार नाही. तुम्हाला शरीराचा हवा तो शेप लगेच नाही मिळवता येणार. तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला शिस्त पाळणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रती वचनबद्ध रहावे लागेल. तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी ठरवलेल्या नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे असते. आपले ध्येय गाठण्यासाठी आपले ध्येय काय असावे, कसे असावे, कसे पूर्ण करावे, जिम करताना येणाऱ्या समस्या व त्यांचे समाधान या सर्व प्रश्नांसाठी तुम्ही जिम मधील ट्रेनरचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे किंवा तुम्ही स्वतः ऑनलाइन मिडियम च्या माध्यमातून या सर्वांचा अभ्यास करू शकता.
हायड्रेटेड राहा
जिम करताना किंवा व्यायाम करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हायड्रेटेड राहणे. असे नाही की फक्त जिम करतानाच खूप पाणी प्यावे, आपण नियमित आणि जास्त पाणी पिण्याची शिस्त लावणे देखील गरजेचे आहे. पाणी आपल्या शरीराला खूप लाभदायक असते. पाणी प्यायल्याने उर्जा वाढते आणि थकवा दूर होतो, वजन कमी करण्यास प्रोत्साहन मिळते, विषारी द्रव्ये बाहेर पडतात, त्वचेचा रंग सुधारतो, रक्तदाब आणि शरीराचे तापमान नियंत्रणात मदत होते, मूत्रपिंडाचे कार्य सुधारते, पचनाची कमतरता आणि सांधे यांचे आरोग्य सुधारते. त्यामुळे पाणी नियमित पणे पिणे गरजेचे आहे.
प्री वर्कआउट आणि पोस्ट वर्कआउट स्नॅक्स
जिम करताना शरीरात ऊर्जा असणे गरजेचे असते, जर शरीरात ऊर्जा नसेल तर अशक्तपणा, चक्कर येणे, वजन/वेट उचलताना शरीराला इजा होऊ शकते. त्यामुळे जिम/व्यायाम करण्या अगोदर आणि जिम/व्यायाम केल्या नंतर शरीराला ऊर्जा मिळणे अत्यंत गरजेचे असते. जिम करण्या अगोदर करायचा नाश्ता म्हणजे प्री वर्कआउट नाश्ता आणि जिम केल्या नंतर करायचा नाश्ता म्हणजे पोस्ट वर्कआउट नाश्ता. हे दोन्ही आहार आपणास भरपूर ऊर्जा देतात जेणेकरून आपण जिम करण्याअगोदर आणि नंतर आपल्यामध्ये शक्ति/ताकत राहावी म्हणून. तर जिम करताना प्री वर्कआउट आणि पोस्ट वर्कआउट आहारामध्ये काय खाणे, कितपत खाणे हे देखील महत्वाचे आहे. तुमच्या प्री वर्कआउट आणि पोस्ट वर्कआउट मध्ये प्रोटीन आणि कार्बोहाइड्रेट असणे गरजेचे आहे. प्री आणि पोस्ट वर्कआउट करताना सर्वोत्तम आहार कोणता हे तुम्ही तुमच्या जिम ट्रेनर, डॉक्टरना विचारू शकता, किंवा तुम्ही ऑनलाइन देखील या बाबत माहिती घेऊ शकता उदाहरण : youtube, health expert vlogs, google, healthy food विकणाऱ्या कंपनी.
विश्रांती महत्त्वाची आहे
जिम करणे जितके मजेदार आहे तितकेच कठोर परिश्रम देखील आहे. जिम केल्यानंतर आपल्या शरीराला उत्स्फूर्तता येते तसेच आपले शरीर थकते. जिम केल्या नंतर पोस्ट वर्कआउट नाश्ता खाऊन आराम करणे/झोपणे गरजेचे असते. शरीराचा व्यायाम झाला की त्याला देखील आरामची गरज असते. जिम/व्यायाम केल्या नंतर आपले स्नायू मजबूत व्हावे आणि लवकर बरे व्हावेत यासाठी आराम करणे गरजेचे आहे. तुम्ही जिम केल्या नंतर आराम केलात तर तुमचे स्नायू लवकर रिकवर होतील जेणेकरून तुमची ऊर्जा लवकर परत येते. त्यामुळे व्यायामानंतर झोप आणि विश्रांती हे तुमच्या व्यायामाइतकेच महत्वाचे आहे.
पूरक आहार का महत्वाचा आहे?
पूरक आहार चरबी कमी करण्यात, स्नायू तयार करण्यात आणि बॉडीबिल्डिंगमधील कार्यक्षमतेसाठी मदत करतो आणि तो एक महत्त्वाचा पैलू आहे. पूरक आहार स्नायू तयार करण्यासाठी आवश्यक पोषक द्रव्ये मिळवण्यास मदत करतात. योग्य आणि चांगल्या गुणवत्तेचे पूरक आहार घेतल्यावर तुम्हाला अनेक लाभ मिळू शकतात आणि तुमचे वर्कआउट ची क्षमता वाढवू शकतात. जसे वर सांगितले प्री वर्कआउट मध्ये योग्य पोषण घेत आहात याची खात्री करणे प्राथमिक महत्त्वाचे आहे. पूरक आहार खूप प्रकारचे असतात. तुम्ही घर बसल्या प्रोटीनयुक्त पदार्थ बनवू शकता, ज्यामध्ये तुम्ही कार्बोहायड्रेट, गुड फॅट शामील करू शकता आणि ते तुम्ही पूरक आहार म्हणून उपयोग करू शकता. जर तुम्हाला सर्वोत्तम आणि लवकर प्रभाव प्रदान करणारे पूरक आहार हवे असतील, किवां तुम्हाला रेडी मेड पूरक आहार हवे असतील तर असे खूप पूरक आहार मार्केट मध्ये उपलब्ध आहेत, उदाहरण वजन वाढवणारे पूरक, क्रिएटिन पावडर, BCAA पावडर.
वजन वाढवणारे पूरक – हे प्रॉडक्ट तुम्हाला मार्केट मध्ये खूप प्रकारच्या व्हराइटी मध्ये मिळेल. हे पूरक आहार तुम्हाला वजन वाढविण्यात मदत करते. हे पूरक द्रव आणि पावडर स्वरूपात उपलब्ध असते. तुम्हाला दैनंदिन जीवनात जर वजन वाढवण्यासाठी योग्य आहार घेत येत नसेल तर हे पूरक आहार तुम्हाला खूप लाभदायक असेल. तुम्ही याचे सेवन करून आपले वजन वाढवू शकता. हे पूरक आहार तुम्हाला पुरेसे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, गुड फॅट प्रदान करतील जेणे करून तुम्हाला वजन वाढविण्यास मदत मिळेल. याचे साइड इफेक्ट्स देखील असतात परंतु तुम्ही जर तुमच्या डॉक्टरांचा आणि जिम ट्रेनरचा सल्ला घेतला तर साइड इफेक्ट्स कसे टाळता येईल हे देखील समझेल. खाली वजन वाढवण्याच्या पूरक आहाराचे काही लाभ दिले गेले आहेत.
1. ते तुम्हाला कॅलरी मानके पूर्ण मिळवण्यात मदत करतात.
2. केवळ अन्नावर अवलंबून राहण्यापेक्षा ते अधिक किफायतशीर आहेत.
3. ते तुम्हाला खाण्याच्या अस्वस्थ इच्छांपासून दूर राहण्यास मदत करतात.
4. ते आपल्याला लवकर रिकवर होण्यास मदत करतात.
5. ते तुमची क्रिएटिनची गरज पूर्ण करतात.
क्रिएटिन पावडर - क्रिएटिन पावडर देखील वजन वाढविण्यास, कमी करण्यास मदत करते. क्रिएटिन पावडर आपण प्री वर्कआउट आणि पोस्ट वर्कआउट मध्ये सेवन करू शकता. अशीच एक सर्वोत्तम क्रिएटिन पावडर मार्केट मध्ये उपलब्ध आहे जिचे नाव creatine price in India असे आहे. या क्रिएटिनची किंमत खूप परवडणारी आहे आणि खाली काही लाभ आहेत जे ही क्रिएटिन पावडर प्रदान करते.
1. मेंदूचे कार्य वाढवते.
2. काही न्यूरोलॉजिकल रोगांशी लढा देण्यास मदत करते.
3. व्यायाम कामगिरी सुधारते.
4. स्नायूंच्या वाढीला गती देते.
5. तुमची कसरत क्षमता वाढवून फिटनेस कामगिरी सुधारते.
6. स्नायू तंतू दुरुस्त करून स्नायूचे मास आणि ताकद वाढविते.
7. दुखापतींचा धोका कमी करून स्नायू लवकर रिकवर होण्यास मदत करते.
BCAA पावडर - ब्रांचड-चेन अमीनो ऍसिड (BCAAs) हे पूरक आहे जे जिम आणि बॉडीबिल्डिंग करू पाहणाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. या मधील एमिनो ॲसिड शरीराला प्रथिने तयार करण्यास मदत करतात, जे नवीन स्नायू तयार करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आवश्यक असतात. याचे काही लाभ खालील प्रमाणे आहेत.
- स्नायूंची वाढ करते.
- स्नायूंच्या नुकसानास प्रतिबंध करते.
- मेंदूचे कार्य सुधारते.
- स्नायू दुखणे कमी करते.
- व्यायामाचा थकवा कमी करते.
जिममध्ये असताना अशा गोष्टी कधीही करू नयेत
1. डायनॅमिक वॉर्म-अप केल्याशिवाय कधीही वर्कआउट करणे सुरू करू नका - तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे स्नायू काम करण्यासाठी तयार करावे लागतील. जर तुम्ही वॉर्म-अप केल्याशिवाय वर्कआउटसुरू केली तरी स्नायू ला दुखापत होऊ शकते जसे की लचक, चमक येणे किवां फ्रॅक्चर होणे.
2. एकट्याने जड वजन उचलू नका - नेहमी ट्रेनर किवां जोडीदाराच्या मदतीने वजन उचला. जड वजन उचलताना किवा ठेवताना तुम्हाला दुखापत होऊ शकते.
३. पोट भरून कधीही कसरत करू नका - जर तुम्ही जेवणाच्या तासाभरात व्यायाम करण्याचा विचार करत असाल तर तुमचे पोट तुमच्यावर खूश नसेल. यामुळे पोट फुगणे, मळमळ, गॅस किंवा अतिसार यासारखे अंतर्ग्रहण होऊ शकतात.
4. फक्त कार्डिओ करू नका - कार्डिओ करणे चांगले आहे परंतु रोज कार्डिओ केल्याने तुम्हाला तुमचे ध्येय पूर्ण करणे शक्य नाही. अशी व्यक्ती बनू नका जी दररोज जिममध्ये तीच कार्डिओ मशीन वापरण्यासाठी येतात आणि नंतर निघून जातात. कार्डिओमुळे तुम्ही वजन वापरुन व्यायाम करण्याचा एक संपूर्ण वेगळा पैलू गमावत आहात.
5. योग्य गियर कधीही विसरू नका - योग्यड्रेसिंग केल्याने तुमचा व्यायाम आणि तुमच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. जिममध्ये नेहमी शूज घाला. हे तुमच्या पायाची बोटे किंवा त्यांच्यावर पडू शकणाऱ्या वजनापासून तुमचे रक्षण करते.
6. मशीनवर कधीही जास्त अवलंबून राहू नका - प्रभावी वर्कआउट रूटीनमध्ये रेझिस्टन्स मशीन महत्वाची असते, परंतु फक्त मशीन वर मुख्य फोकस नसावा. जर दररोज तुमचा बराचसा वर्कआउट मशीनवर केला जात असेल, तर तुम्हाला सर्वोत्तम परिणाम मिळू शकणार नाही. म्हणून फक्त मशीनचा वर्कआउट करू नका.
7. व्यायामासाठी कधीही घाई करू नका - घाईघाईने व्यायाम केल्याने तुम्हाला काही फायदा होणार नाही. आपल्या वर्कआउटची प्रभावीता सुनिश्चित करण्यासाठी, प्रत्येक रिपीटेशनवर फोकस करा. तुमचा फॉर्म योग्य असल्याची खात्री करा.
8. स्वतःला हायड्रेट केल्याशिवाय व्यायाम करू नका - पाण्याचे काही अविश्वसनीय आरोग्यफायदे आहेत. शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, विशेषत: व्यायाम करण्याच्या तीव्र पातळीवर. तुमच्याकडे पुरेसे पाणी असल्याची खात्री करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तुमच्यासोबत पाण्याची बॉटल/पाण्याचा जार घेऊन येणे.
निष्कर्ष –
तर अशाप्रकारे आपण जिम करताना योग्य ती काळजी घेऊन, योग्य नियमानुसार वर्कआउट करून, योग्य पूरक आहार जसे वजन वाढीसाठी पूरक, क्रिएटिन पावडर आणि BCCA Powder चा योग्य वापर करून आपले जिम चे, शरीराचे ध्येय पूर्ण करावे. आपले शरीर उत्तम तर आपले आयुष्य उत्तम. शरीर उत्तम ठेवण्यासाठी आपली जीवनशैली, शरीराचा व्यायाम, चांगले अन्न आणि भरपूर आराम आणि झोप महत्वाची असते.
Disclaimer : हे एक फिचर आर्टिकल आहे. एबीपी नेटवर्क प्रा. Ltd. किंवा ABP Live त्याच्या मजकुराचे किंवा येथे व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन करत नाही. सर्व माहिती जशीच्या तशी दिली जाते.या माहितीमध्ये सल्ला किंवा खरेदीची ऑफर दिली जात नाही. अशी कोणतीही खरेदी करण्यापूर्वी तज्ञ सल्लागार आणि आरोग्य व्यावसायिकांचा सल्ला घ्या.