डीईएस पुणे युनिव्हर्सिटीच्या उद्घाटनासह डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शिरपेचात खोवला अजून एक मानाचा तुरा
DES Pune University Inauguration: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पुणे युनिव्हर्सिटीचा उद्घाटन सोहळा पार पडला.
भारत, 30 ऑक्टोबर 2023 : तब्बल 138 वर्षांचा वैभवशाली वारसा असलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीने 15 ऑक्टोबर 2023 रोजी #UniversityWithLegacy डीईएस पुणे युनिव्हर्सिटी, पुणे या संस्थेचे उद्घाटन करत एक ऐतिहासिक पाऊल टाकले. या ऐतिहासिक कार्यक्रमात युनिव्हर्सिटीचा संपन्न वारसा आणि दूरदृष्टीचे दर्शन घडविण्यात आले आणि अत्याधुनिक शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या निर्धारावर शिक्कामोर्तब झाले.
नव्या शैक्षणिक संस्थेत विविध प्रकारचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याच्या मिशनशी सुसंगत राहत विविध उद्योगक्षेत्रांसाठी उपयुक्त असलेल्या आंतरशाखीय अभ्यासक्रमाशी सांगड घालण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण, कापडउद्योग आणि संसदीय कामकाज मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे (एआयसीटीई) उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे आणि पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय प्रेसिडेंट श्री. शाहू छत्रपती कोल्हापूर हे मान्यवर उपस्थित होते.
कौन्सिल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे व्हाइस चेअरमन डॉ. रवींद्र आचार्य यांनी स्वागतपर भाषण केले. डीईएसपीयूच्या स्थापनेमागील विचार विषद करताना डीईएसपीयूचे संस्थापक कुलगुरू प्रा. प्रसाद डी. खांडेकर यांनी भारतीय शिक्षणयंत्रणेच्या व्याप्तीवर आणि संभाव्य वृद्धीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "2023 मध्ये भारतात एकूण 1074 विद्यापीठे असतील; त्यापैकी 430 विद्यापीठे खासगी असतील. विद्यापीठांच्या संख्येचा विचार करता 2030 पर्यंत 50 टक्के सकल पटनोंदणी साध्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. पटनोंदणीचा विचार करता 2041 पर्यंत 15 ते 64 या वयोगटातील (वर्किंग एज पॉप्युलेशन) पटनोंदणीचे प्रमाण 59 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. विकसित देशांशी तुलना करता भारतातील उच्च शिक्षण व संशोधनातील सहभाग 7 टक्के आहे. यातूनच आपल्या देशाला जागतिक दर्जाच्या शिक्षणाची किती गरज आहे, ते दिसून येते."
प्रा. खांडेकर यांनी ज्ञानाच्या प्रसारासोबतच इनोव्हेशनसाठी उत्प्रेरक होण्यावर डीईएसपीयूचा भर असेल, हे अधोरेखित केले. वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम, इंट्रोडक्टरी प्रोजेक्ट्स, भारतीय मूल्यांचा पाया असलेले बहुशाखीय उपक्रम या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्कृष्टता प्रदान करण्याची विद्यापीठाची मनिषा आहे. 'राष्ट्र सर्वप्रथम' हे डीईएसपीयूचे मूल्य असून शिस्त, विश्वास व पारदर्शकेसाठी ही संस्था वचनबद्ध आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेला आणि विवेचनात्मक विचारप्रक्रियेला चालना देणारे पोषक वातावरण निर्माण करण्यावर या संस्थेचा भर असतो. अत्याधुनिक संशोधन व ज्ञानाप्रती असलेला अढळ निर्धार हा शैक्षणिक व देशाची प्रगती करण्याचा खरा मार्ग आहे. डीईएसपीयूच्या शैक्षणिक क्षेत्रात बदल घडविण्याच्या प्रवासात सर्व भागधारकांनी सहभागी होऊन डीईएस पुणे युनिव्हर्सिटीला एक वैशिष्ट्यपूर्ण व प्रतिष्ठित संस्था म्हणून घडविण्याचे आवाहन प्राध्यापक खांडेकर यांनी केले.
डीईएसपीयूच्या लोगोचे अनावरण करून महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण, कापडउद्योग आणि संसदीय कामकाज मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात डीईएसच्या अमूलाग्र बदलाबद्दल विचार मांडले. आपल्या फ्लॅगशिप युनिव्हर्सिटीच्या लाँचसाठी डीईएसपीयू टीमच्या यशस्वी स्थापनेबद्दल त्यांनी प्रशंसा केली. संशोधन व शिक्षणाचा पाया निर्माण डीईएसपीयूतर्फे प्राधान्य देण्याच्या क्षमतेवर भर दिला. या माध्यमातून महाराष्ट्र आणि भारताच्या प्रगती व विकासामध्ये महत्त्वपूर्ण व व्यापक योगदान दिले जाईल, असे ते म्हणाले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्री. शाहू छत्रपती यांनी डीईएसपीयू ही संस्था म्हणजे शिक्षणाला असलेलला अढळ पाठिंबा व प्रतिबद्धतेचे द्योतक आहे, असे म्हणाले. यातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधणे, बौद्धिक उत्सुकता वाढीस लावण्याला आणि जागतिक पातळीवरील स्पर्धात्मकता बाणवण्याचे त्यांचे प्रयत्न अधोरेखित करते. जागतिकीकरण व तंत्रज्ञान प्रगतीच्या या सतत बदल जाणाऱ्या जगात शैक्षणिक स्पर्धात्मकतेचे महत्त्व केंद्रस्थानी असते. या प्रयत्नात विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांनी एकत्रितपणे वाटचाल केली पाहिजे आणि डीईएसपीयू अध्ययन व इनोव्हेशनचे केंद्र होण्यासाठी प्रतिबद्ध आहे आणि या विद्यापीठात परंपरा व आधुनिकतेमधील दुवा साधण्यात आला आहे. आपल्या मनोगताच्या शेवटी त्यांनी समर्पित अध्यापकवर्ग आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या अढळ निर्धार व अविरत प्रयत्नांमुळे डीईएस पुणे युनिव्हर्सिटी स्थापनेचे व्हिजन प्रत्यक्षात उतरले आहे.
डीईएस ही कायम एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था राहिली आहे. महाराष्ट्रात त्यांच्या 40 संस्था आहेत आणि आंध्रप्रदेशमध्ये एक संस्था आहे. डेक्कन एज्युकेशन संस्थेच्या कौन्सिल व नियामक मंडळाचे चेअरमन डॉ. शरद कुंटे यांनी, भारतीय समाजात उच्चशिक्षणाचे महत्त्व वाढविण्यासाठी डीईएसने निभावलेली भूमिका अधोरेखित केली. उच्चशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समाजामध्ये अर्थपूर्ण योगदान देण्याच्या दृष्टीने आवश्यक कौशल्ये व ज्ञान देण्यात येते आणि सामाजिक समता व सामाजिक स्तराची प्रगती करण्यात येते.
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे व्हाइस चेअरमन डॉ. अभय जेरे यांनी कामाच्या बदलत्या स्वरुपाला प्रतिसाद देणाऱ्या गिग अर्थव्यवस्थेवर (लघु कालावधीसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे) भर दिला. प्रवाही बाजारपेठ व आर्थिक अस्थिरतेसाठी विद्यार्थ्यांना सज्ज करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या महत्त्वाकांक्षा व स्वप्ने या विषयी त्यांच्या पालकांशी चर्चा करण्याची संधी मिळत नाही या वस्तुस्थितीची जाणीव ठेवत, विद्यार्थ्यांचे समुपदेशन व त्यांना मार्गदर्शन करण्यात अध्यापकांच्या भूमिकेच्या महत्त्वावर त्यांनी प्रकाश टाकला. डीईएसपीयूसारख्या संस्था विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्यापकांशी अर्थपूर्ण चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यास पोषक वातावरणा मिळण्यास चालना मिळते आणि अध्यापक-विद्यार्थी नाते दृढ होते, असे ते म्हणाले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. धनंजय कुलकर्णी यांच्या भाषणाने या यशस्वी कार्यक्रमाची सांगता झाली. आपल्या विद्यार्थ्यांनी निवडलेल्या शाखेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करावी यासाठी डीईएस पुणे युनिव्हर्सिटीतर्फे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला. या व्यतिरिक्त, या संस्थेचे मिशन पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेले अध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा अढळ निर्धार आणि परिश्रमपूर्वक केले प्रयत्न यांची त्यांनी प्रशंसा केली. स्पर्धात्मक, जागतिक पातळीवर जोडलेले व तंत्रज्ञानावर चालणारे जग घडविण्यासाठी उच्च शिक्षणाचे महत्त्व या संस्थेच्या व्हिजनमध्ये स्पष्टपणे दिसून येते. पुढे जाताना, डीईएस पुणे युनिव्हर्सिटी हे अध्ययन, इनोव्हेशन, परंपरेचे केंद्र असेल आणि भारताच्या बदलणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल. या कार्यक्रमाच्या औचित्याने एक मोठी झेप घेतली आहे आणि #UniversityWithLegacy च्या बदलत्या शिक्षणयुगाची नांदी झाली आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या : https://despu.edu.in/