एक्स्प्लोर

अभय भुतडा फाउंडेशनतर्फे 300 विद्यार्थ्यांना रु.21 लाखांच्या शिष्यवृत्तीचे वाटप

अभय भुतडा फाउंडेशनतर्फे 300 विद्यार्थ्यांना रु.21 लाखांच्या शिष्यवृत्तीचे वाटप

पुणे, जुलै 2026 : अभय भुतडा फाउंडेशनने 'देवा भाऊ स्कूल स्कॉलरशिप' उपक्रमासाठी रु. 21 लाखांचे योगदान दिले आहे. या कार्यक्रमांतर्गत पुण्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमधील 300 शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या सहकार्याने 22 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.

हिंदू गर्जना प्रतिष्ठानने आपल्या शाळांच्या आणि समाजातील कार्यकर्त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची निवड केली. निवडीसाठी अशा गुणवंत विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले, ज्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींमुळे त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष, भाजप पुणे शहराध्यक्ष आणि नगरसेवक श्री. धीरज घाटे, कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. उमेश शेळके तसेच श्रीमती स्मिता वास्ते, श्री. अमर आवळे, श्रीमती मनीषा घाटे, श्रीमती प्रियांका शेंडगे आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

या उपक्रमाविषयी बोलताना उद्योजक, समाजसेवक तसेच अभय भुतडा फाउंडेशन आणि टॅब ग्लोबल व्हेंचर्सचे अध्यक्ष सीए अभय भुतडा म्हणाले

प्रत्येक मुलाच्या शिक्षणामागे त्याची स्वप्ने जपणारे एक कुटुंब उभे असते. 300 विद्यार्थ्यांना दिलेली रु. 21 लाखांची ही शिष्यवृत्ती म्हणजे त्यांचा प्रवास थोडा सुकर करण्याचा आणि समाज पाठीशी आहे हा विश्वास देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे, मोजक्यांचा विशेषाधिकार नव्हे. या मुलांना पाठबळ देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि ती पेलणाऱ्या या उपक्रमाचा भाग होता आले, याचा आम्हाला आनंद आहे.”

शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक वारसा संवर्धन आणि आपत्ती निवारण अशा विविध क्षेत्रांत अभय भुतडा फाउंडेशन कार्यरत आहे. शिक्षण क्षेत्रात फाउंडेशनने ग्रामीण आणि संसाधनांची कमतरता असलेल्या शाळांमध्ये प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) शिकण्यासाठी शैक्षणिक किट उपलब्ध करून दिली आहेत. तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीही दिल्या आहेत. शिक्षणाबरोबरच अधिकाधिक खेळाडूंना संधी मिळावी यासाठी विविध क्रीडा स्पर्धांना पाठबळ देण्यात आले आहे. तसेच पुण्यातील ‘शिवसृष्टी’सारख्या उपक्रमांना सहकार्य करून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा अधिकाधिक कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याचे कामही करण्यात आले आहे. राज्यात आलेल्या पुराच्या काळात गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी फाउंडेशनने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीस रु.5 कोटींचे योगदान दिले होते.

अभय भुतडा फाउंडेशनविषयी

2023 मध्ये स्थापन करण्यात आलेले अभय भुतडा फाउंडेशन समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी , शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी अल्पकालीन मदतीपेक्षा दीर्घकालीन परिणामांवर भर देत, प्रत्येक उपक्रम शाश्वत आणि मोजता येण्याजोगे परिणाम साध्य करण्याच्या दृष्टीने राबवला जातो. सीए अभय भुतडा यांच्या पूर्ण आर्थिक पाठबळातून, कोणतीही बाह्य निधी उभारणी न करता कार्यरत असलेले ही फाउंडेशन शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक जतन या क्षेत्रांमध्ये विविध उपक्रमांना समर्थन देते. अल्पावधीतच महाराष्ट्रभरातील लाखो लोकांपर्यंत फाउंडेशनच्या उपक्रमांचा प्रभाव पोहोचला असून, समाजात अर्थपूर्ण आणि दीर्घकालीन बदल घडवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.

Disclaimer: This is a sponsored article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.

आणखी वाचा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
Shetkari Karjmafi: कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ; यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेतही तफावत, शेतकऱ्यांचा संताप, नेमकी अडचण काय?
कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ; यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेतही तफावत, शेतकऱ्यांचा संताप, नेमकी अडचण काय?
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Embed widget