देशात एकीकडे G20 चं आयोजन सुरु आहे. दिल्ली अगदी एका नववधूसारखी सजली आहे. तर, त्याचवेळी बाजारात सुद्धा हिरवळ बघायला मिळते आहे. आशिया खंडातील इतर इमर्जिंग मार्केटच्या तुलनेत, एफपीआय ज्यांना फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर म्हणतात, जे आपल्या येथील शेअर बाजारात तत्सम ठिकाणी गुंतवणूक करतात, त्यांनी भारताला पसंती दर्शवली आहे. एनएसडीएलच्या आकड्यांनुसार मागील 15 वर्षात केवळ नऊ वेळा असे झाले आहे की, सहा महिन्यांचे सतत गुंतवणुकीचे आकडे हे 20.5 बिलियन डॉलर्सच्या वर गेले आहेत म्हणजेच जवळपास एक लाख 69 हजार कोटीच्यांवर गेले आहेत. जे की मागील 28 महिन्यात सर्वाधिक आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यात आपल्या बाजारांमध्ये जवळपास 12 हजार कोटींच्या वर गुंतवणूक झाली आहे आणि आशिया खंडातील इतर बाजारांच्या तुलनेत मागील तीन महिन्यातच जवळपास पाच टक्के नफा भारतीय शेअर बाजाराने दिला असून 2023 च्या वित्तीय वर्षात 13 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. 


ह्या सर्व बातम्यांचा आपण सामान्य गुंतवणूकदार म्हणून काय फायदा करून घेणार आहोत हे महत्वाचे. ह्या सगळ्या बातम्यांमधून आपल्याला काही घेण्यासारखे आहे का? हे बघणे महत्वाचे. बातम्यांचा गर्भितार्थ समजणे महत्वाचे आणि त्यानुसार पावले उचलून आपल्या घरी समृद्धी आणणे महत्वाचे. 


शुक्रवारी आपल्या संरक्षण मंत्र्यांनी एक घोषणा केली. त्यांनी सांगितले की, चालू वित्तीय वर्षात संरक्षण क्षेत्राने सोळा हजार कोटींची निर्यात केली असून ही G20 पेक्षा मोठी उडी आहे आणि आता आपले प्रॉडक्ट्स जवळपास 85 देशांपर्यंत पोहोचले आहे. आफ्रिका आणि दक्षिण पूर्व आशियातील इतर देशांसोबत आपली स्पर्धा असून बऱ्याच लोकांना आपण मात देण्याची ताकत ठेवतो. आता ह्यातून आपण काय शिकणार आहोत किंवा ह्यातून आपण गुंतवणूकदार म्हणून काही घेऊ शकतो का हे बघण्याचा प्रयत्न करू, आपण कुठल्याही गुंतवणुकीच्या आधी क्वालिटेटिव अॅनालिसिस करायचे आणि मग क्वाटिंटेटीव अॅनालिसिस करायचे असे बघितले होते आणि मग तसे असेल तर एकूण संरक्षण क्षेत्राला तर सुगीचे दिवस येऊ शकतात. मग आपल्या येथील संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे काय आकडे आहे ते बघण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा ही टीप नसून, आपण अभ्यासपूर्वक हे समजण्याचा प्रयत्न करत आहोत, हे सगळ्यात आधी लक्षात घ्या. 


आता एक्स्प्लोझिव म्हणजे दारुगोळा निर्मिती क्षेत्रात 24 टक्क्यांचा दणदणीत प्रभाव ज्या कंपनीचा आहे, ती म्हणजे सोलार इंडस्ट्रीज. 2010 मध्ये ही कंपनी उदयाला आली असून या कंपनीने 51 देशांमध्ये आपला विस्तार केला आहे. एकूणच ह्या क्षेत्रातील आपल्या देशाची प्रगती आणि वाटचाल आणि ह्या कंपनीची वाटचाल लक्षात घेता ह्या कंपनीचे मागील पाच वर्षाच्या विक्रीचे आकडे बघितले. तर, 29 टक्क्यांनी सरासरी ते वाढत आहे आणि त्याचबरोबर ह्या कंपनीचा नफा बघितला. तर, असे लक्षात येते की, ह्या कंपनीचा नफा सुद्धा सरासरी 28 टक्क्यांनी वाढतो आहे. म्हणजे विक्री आणि नफा हे योग्य आणि एकाच दिशेने चालले आहे. मग कंपनीवर कर्ज किती आहे, हे बघायचे झाले तर पाच महिन्यांपूर्वीच्या आकड्यांनुसार ह्या कंपनीवर जवळपास 1100 कोटी रुपयांचे कर्ज आहे. एकूण मालमत्ता किती आहे? तर 2600 कोटींची आहे. म्हणजे मत्तेच्या तुलनेत कर्ज हे कमी आहे. आपण ज्याला डेट टू इक्विटी रेशिओ आहे तो 1 पेक्षा कमी आहे म्हणजे ती पण जमेची बाजू आहे. प्रमोटरचे होल्डिंग 73 टक्के असून, बुक वॅल्यू 288 असून सध्या जो बाजारभाव सुरु आहे 4646 तो बुक वाल्यूच्या सोळा पट आहे. जरा महाग वाटत असेल ह्या दृष्टीने हा समभाग पीईच्या दृष्टीने सुद्धा इंडस्ट्रीचा पीई 32 आहे तर ह्या समभागाचा पीइ 53 आहे इथे सुद्धा हा थोडा महाग काही जाणकारांना वाटू शकतो. म्हणजे काय आपण बघितल्या गोष्टींप्रमाणे जमेची बाजू असली तरी सध्या काही लोकांना हा महाग वाटू शकतो. पण ह्याचा विचार करायला काही हरकत नाही. 


मुळात शेअर बाजार हे काही झटपट श्रोमंत होण्याचे साधन नसून, ह्यात दिर्घावधीमध्ये मात्र समृद्धी नक्की निर्मिली जाते आणि असे असेल तर अभ्यासपूर्वक आपला दृष्टी आणि दृष्टीकोन ठेवला, खरेदी योग्य केली तर दीर्घावधीमध्ये नक्कीच लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते. राकेश झुनझुनवाला म्हणायचे की, शेअर विकत घेणे म्हणजे केवळ आणि केवळ कॉमन सेन्स आहे. एका हयातीत ह्यांनी हजारो कोटींची संपत्ती जमवली आणि पुढे तोच वारसा विजय केडिया नेत आहेत. एक वेळ होती की, त्यांच्याकडे दूध विकत घ्यायला सुद्धा पैसे नव्हते पण आणि आज 14 हजार कोटी एका पिढीने ते पण व्हाईटमध्ये कमवले असून हे केवळ आणि केवळ दीर्घावधीच्या खरेदीने शक्य झाले आहे. 


त्यामुळे जेव्हा पण काही बातम्या येतात किंवा आपल्या अवतीभवती जे पण काही होते त्याचा उपयोग आपण आपल्या अर्थचक्रात कसा करू शकतो, हे बघणे महत्वाचे असते आणि त्याच दृष्टीने पावले उचलणे. G20 चा झगामगाट एका आठवड्यात मंदावेल, अध्यक्ष बायडन आणि पंतप्रधान मोदींच्या बाय लॅटरल बैठकीत काय ठरते हे जगाला कळेलच, आलेले 18 देशांचे राष्ट्राध्यक्ष काही न काही सकारात्मक देवाणघेवाण करतील, पण त्या सगळ्यांनी 150 कोटींची बाजारपेठ असलेल्या भारताचे काय भविष्य बदलेल आणि अनुक्रमे आपले काय बदलेल हे आपण बघयला हवे. जसे आज आपण अजून एक उदाहरण बघितले की, फंडामेंटल अॅनालिसिस कसे करायचे आणि आलेल्या बातम्यांचा आपण स्वतःच्या समृद्धी आगमनासाठी कसा उपयोग करू शकतो, हे शिकणे महत्वाचे आणि तेच आपण बघणार आहोत. तोवर आपण बिनधास्त गुंतवणूक करा फक्त जरा जपून.     


गुंतवणुकीसंदर्भातील इतर ब्लॉग :