'भाषा पैशाची' च्या या भागात आपण आर्थिक नियोजनाच्या पुढील टप्प्याकडे वळणार आहोत. मागील भागात आपण आर्थिक नियोजनात सुरुवातीच्या पायऱ्यांबद्दल चर्चा केली होती.  मागील उदाहरणालाच आपल्याला आता पुढे न्यायचे आहे. तर मागे आपण मुलीच्या लग्नाचे आर्थिक नियोजन कसे करायचे याची योजना केली होती.  त्यामध्ये 30 लाख रुपयांचे लक्ष्य हे पुढील 23 वर्षांमध्ये कसे साध्य करायचे आणि त्यासाठी कुठल्या ऍसेट क्लासमधून किती परतावा मिळतो हे देखील आपण जाणून घेतले. त्यामध्ये सगळ्यात जास्त सरासरी परतावा हा शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड्समध्ये मिळतो. अश्यातच हे ध्येय साध्य करायचे असेल तर आपल्याला मार्गक्रमण आज पासून करणे आवश्यक आहे.                            


लक्ष्य - 30,55,800
अपेक्षित परतावा - 12%
एकरकमी गुंतवणूक - 2,25,481
वार्षिक गुंतवणूक - 29,213
मासिक गुंतवणूक - 2095
         
म्हणजेच काय तर आपण आपल्या गुंतवणुकीवर 12 टक्के वार्षिक परतावा मिळेल असे अपेक्षित केले. ही अपेक्षा भूतकाळातील आकड्यावरून आणि अभ्यासावरून निश्चित करण्यात येत आहे. मागील 40 ते 50 वर्षांचा विचार केला तर सरासरी बारा ते तेरा टक्के परतावा गुंतवणुकीमधून मिळाला आहे. आपण अगदी 13 वगैरे न पकडता  12 टक्केच परतावा दीर्घावधीत मिळेल,   असा विचार केला तर तेवीस वर्षांनी तीस लाखांचे लक्ष्य साध्य करायचे असेल तर एक रकमी आज दोन लाख पंचवीस हजारांची गुंतवणूक शेअर बाजार किंवा  म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही करु शकता. तसेच बारा टक्के परतावा मिळेल अशी अपेक्षा करून वार्षिक 30000 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल. तर हेच लक्ष्य साध्य करायला मासिक केवळ दोन हजारांची एसआयपी करावी लागेल. 


आता एसआयपी म्हणजे काय?


जसे बँकेत आरडी म्हणजे दर महिन्याला किंवा सहा महिन्याला थोडक्यात विशिष्ट कालावधीसाठी सतत गुंतवणूक केली जाते. त्या गुंतवणुकीस 'आरडी' असे म्हणतात.  ज्यात परतावा आधी सांगितल्याप्रमाणे अगदी तुटपुंजा असतो.  त्यामध्ये जर 12 टक्के परतावा मिळत असेल तर काही वाईट नाही. 


त्यामुळे याचा विचार सुद्धा आर्थिक नियोजन केले जाऊ शकते. आता हजारो कंपन्यांपैकी आपण कुठे गुंतवणूक करावी असा प्रश्न पडत असेल.  कारण बऱ्याच लोकांचे असे अनुभव  आहेत की,  त्यांनी शेअर विकत घेतला आणि दुसऱ्याच दिवशी तो पडला. असे खूप लोकांचे अनुभव असतील आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात शेअर बाजाराकडे लक्ष देणे होत नाही. कारण प्रत्येकजण त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतो. तसेच बऱ्याचदा शेअर बाजाराची भाषा देखील आपल्याला कळत नाही. त्यामुळे अशावेळी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणजे  म्युच्युअल फंड्स.


म्युच्युअल फंड म्हणजे तुमच्या आणि आमच्या सहमतीने तयार झालेला फंड.हा फंड आपल्या वतीने शेअर बाजारात लागतो आणि मग फायदा झाला तर आपल्यात विभागून दिला जातो.   नुकसान झालं तर आपल्याला सहन करावे लागते, पण मगतुम्ही म्हणाल कि नुकसान होण्याची शक्यता आहे तर तिकडे पाठ्वतेच कशाला. पण इतिहासातील आकडे असे सांगतात कि बाजार जो कुणी व्यक्ती कुठलेही ८ वर्षे बाजारात थांबला तर त्याला कधी नुकसान नाही होत. अपवाद ह्याला सुद्धा असतील. पण दीर्घावधी म्हणजे पुस्तकातील १ वर्ष्याच्या वर वगैरे सगळे सपशेल खोटे असून, बाजारात किमान ८ वर्षासाठी गुंतवणूक करायला हवी. आता पुढील परशा हा उद्भवू शकतो कि म्युच्युअल फंदात नेमकी गुंतवणूक करावी कुठे. तर ४५ ,म्युच्युअल फंड कंपन्यांकडे  हजारो स्कीम्स आहे, कुठली स्कीम कशी परफॉर्म करते ह्या पेक्षा थेट इंडेक्स फंडात गुंतवणूक केली पाहिजे


तेव्हा अश्या प्रकारे आपल्या कुठल्याही ध्येयाचे लक्ष्य निश्चित करून त्या साठी एक एसआयपी ने आपल्या आर्थिक नियोजनाची सुरुवात करू शकतो, आणि ती केल्यावर त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असते. तेव्हा आजच मागील लेख आणि आजचा लेख मिळून अभ्यास करून आपले नियोजन पूर्ण करूया आणि ध्येयपूर्तीच्या मार्गावर सुरुवात करून पहिले पॉल टाकूया... बघा पटतंय का ?


शिवानी दाणी वखरे यांचा ब्लॉग :


BLOG: भाषा पैशाची; फायनान्शिअल प्लॅनिंग अथवा आर्थिक साक्षरता म्हणजे नेमके काय?