डॉ. रणजीतसिंह डिसले हे सोलापूर जिल्हा परिषदेच्या माढा तालुक्यातील कदम वस्तीवरील शाळेतील एक प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांना २०२० सालचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे. प्राथमिक शिक्षण टेक्नोसॅव्ही बनवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. शालेय पाठ्यपुस्तकांवरील क्यूआरकोड ही त्यांचीच संकल्पना. क्यूआर कोड द्वारे त्यांनी शैक्षणिक दृकश्राव्य साधनांची जोड दिली. सध्या ते फुलब्राईट फेलोशिपमार्फत अमेरिकेतील शालेय शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करत आहेत.