Sun Transit : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी बदलाचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर नक्कीच पडतो. सूर्याने आपली राशी बदलली, 14 एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश केला आणि 14 मे पर्यंत तो येथेच राहील. ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार सूर्य हा पराक्रम, धैर्याचा कारक मानला जातो. मेष राशीमध्ये सूर्य असल्यामुळे 'या' 3 राशींना खूप फायदा होणार आहे.


मिथुन : सूर्य मेष राशीत असल्याने मिथुन राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. मिथुन राशीच्या 11व्या घरात सूर्य देवाच्या प्रभावामुळे कुटुंबाची कमाई वाढेल. व्यावसायिक संबंध दृढ झाल्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होतील आणि त्यामुळे व्यवसाय वाढण्यासही मदत होईल.


कर्क : कर्क राशीच्या लोकांसाठी मेष राशीत सूर्याचे स्थान खूप फायदेशीर ठरेल. कर्क राशीच्या दहाव्या घरात प्रभावित. हे घर (स्थान) नोकरी आणि करिअरचे मानले जाते. या राशीच्या लोकांना नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यापारी वर्गाला खूप फायदा होईल. कार्यशैली सुधारून कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाऊ शकते. कर्क राशीचा ग्रह चंद्र आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्र देव आणि सूर्य देव यांच्यातील मैत्रीची भावना आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना त्याचा लाभ मिळेल.


मीन : मीन राशीच्या दुसऱ्या घरात सूर्यदेवाचा प्रभाव खूप फायदेशीर ठरेल. या काळात त्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. त्यांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. पदोन्नतीच्या संधी मिळतील. लग्नाचे योगही झाले आहेत. अविवाहितांचे नाते निश्चित होऊ शकते.


मंगळ-शनि युती
ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आणि शनि हे दोन शत्रू ग्रह 29 एप्रिल ते 17 मे पर्यंत एकाच राशीत राहून संयोग घडवत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार 29 एप्रिल 2022 रोजी सकाळी 09:57 वाजता शनिने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. तेथे मंगळ आधीच उपस्थित होता. कुंभ राशीत मंगळ आणि शनि यांच्या संयोगामुळे “द्वेले योग” तयार झाला आहे. जो ज्योतिष शास्त्रात अत्यंत अशुभ योग मानला जातो. या संयोगामुळे या तीन राशीच्या लोकांना खूप त्रास होईल.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या :