Weekly Numerology Predictions : नवीन आठवड्याची सुरुवात सोमवार 20 मे पासून सुरू होतेय. येणारा नवीन आठवडा 5 मूलांकासाठी चांगला ठरू शकतो. या दरम्यान या पाच मूलांकाच्या लोकांना प्रेम जीवनात चांगले परिणाम मिळतील. हे मूलांक नेमके कोणते ते जाणून घेऊयात.  


मूलांक 1 -


ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक क्रमांक 1 आहे. या जन्मतारखेच्या लोकांसाठी नवीन आठवडा प्रेमसंबंधांच्या बाबतीत चांगला असणार आहे.  या आठवड्यात तुम्ही तुमच्या नात्यातील जोडीदाराशी चांगले राहाल. या दरम्यान तुम्ही बाहेर कुठेतरी जाण्याचा बेतदेखील आखू शकता. 


मूलांक 3 -


ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक क्रमांक 3 आहे. मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. तुमचं नाते अधिक घट्ट होईल. तुम्ही एकमेकांच्या सहवासाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. या आठवड्यात तुम्ही एकमेकांच्या कुटुंबियांना भेटण्याची योजना देखील आखू शकता.


मूलांक 5 -


ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक क्रमांक 5 आहे. नवीन आठवडा मूलांक 5 असलेल्या लोकांसाठी प्रेमसंबंधांसाठी खूप शुभ असणार आहे. तुम्ही तुमच्या जौडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल.  


मूलांक 6 -


ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक 6 असतो. या मूलांकाच्या लोकांचे त्यांच्या जोडीदारांशी चांगले संबंध असतील. तुम्ही एकमेकांच्या गरजा समजून घ्याल. तसेच तुम्ही बाहेर जाण्याची योजना देखील आखू  शकता. या आठवड्यात तुमच्या नात्यात घट्ट प्रेम असेल.  


मूलांक 9 -


ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 9 आहे. या आठवड्यात तुमचे प्रेम जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील. तुम्ही एकत्र बाहेर जाण्याचा प्लॅन देखील करू शकता.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Horoscope 20 To 26 May 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या