Mohini Ekadashi 2024 : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशी आज, म्हणजेच19 मे 2024 रोजी आहे. मोहिनी हा भगवान विष्णूचा एकमेव स्त्री अवतार आहे, जो त्याने समुद्रमंथनानंतर बाहेर पडलेल्या अमृत पात्राचे रक्षण करण्यासाठी घेतला होता.


या वर्षी मोहिनी एकादशीला (Mohini Ekadashi 2024) अतिशय शुभ योग तयार होत आहेत, जे काही राशींसाठी फार भाग्याचे ठरतील. मोहिनी एकादशीला बनत असलेल्या योगांचा 3 राशींना विशेष फायदा होईल. या शुभ योगांच्या निर्मितीमुळे 3 राशींच्या धनात वाढ होईल, त्यांना कौटुंबिक सुख लागेल आणि नोकरीत बढतीची देखील शक्यता आहे. या दिवशी नेमके कोणते योग जुळून आले आहेत? आणि याचा कोणत्या राशींना फायदा होणार? जाणून घेऊया.


मोहिनी एकादशीला जुळून आले 5 शुभ योग (Mohini Ekadashi 2024 Auspicious Yog)


उदय तिथीनुसार, 19 मे रोजी मोहिनी एकादशीचं व्रत ठेवलं जाईल. या दिवशी अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत. याशिवाय या दिवशी शुक्र आणि सूर्य वृषभ राशीत राहणार असल्याने शुक्रादित्य योग आणि राजभंग योग देखील बनत आहेत. या योगाचा शुभ परिणाम अनेक राशींच्या व्यक्तींवर पडेल, त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतील आणि त्यांच्या संपत्तीत अपार वाढ होईल.


सर्वार्थ सिद्धी योग - 19 मे, पहाटे 05.28 ते 20 मे, पहाटे 03:16
अमृत ​​सिद्धी योग - 19 मे, पहाटे 05.28 ते 20 मे, पहाटे 03:16
शुक्रादित्य योग
राजभंग योग


मोहिनी एकादशी 2024 'या' राशींसाठी फलदायी  (Mohini Ekadashi 2024 Lucky Zodiac sign)


मेष रास - मोहिनी एकादशी धनाच्या दृष्टीने मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे तुमचं उत्पन्न वाढेल. कमाईचे नवीन स्रोत उघडतील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. प्रलंबित कामं पूर्ण होतील. व्यवसाय विस्तारासाठी केलेली योजना यशस्वी होईल, ज्यामुळे दीर्घकाळ आर्थिक लाभ होईल.


वृश्चिक रास - मोहिनी एकादशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनेक शुभ संधी घेऊन येत आहे, तुमची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकेल. कौटुंबिक सौहार्द राहील. नोकरीत तुमच्या कामाचं कौतुक होईल. पगार वाढण्याची दाट शक्यता आहे.


सिंह रास - मोहिनी एकादशीला तयार होत असलेल्या योगाच्या शुभ प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व पूर्वीपेक्षा चांगलं होईल. नोकरदार लोक त्यांच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करतील आणि त्यांना उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील. कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी वाढेल. विवाहितांसाठीही हा काळ अनुकूल राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Mohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या अचूक तिथी, मुहूर्त आणि पूजा विधी


Rahu 2024 : राहू 'या' राशींवर पडणार भारी; येता काळ संघर्षाचा, वर्षभर अडचणी संपता संपणार नाही