Weekly Horoscope 20 To 26 May 2024 : मे महिन्याचा नवीन आठवडा फार खास असणार आहे. या आठवड्यात अनेक ग्रह राशी परिवर्तन तर करणारच आहेत पण त्याचबरोबर अनेक राजयोग देखील बनणार आहेत. त्यामुळे अनेक राशींसाठी हा आठवडा खास असणार आहे. मेष ते मीन राशीसाठी नवीन आठवडा नेमका कसा असणार आहे यासाठी साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) अधिक माहिती जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries)


मे महिन्याचा हा नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी व्यस्त असणार आहे. पण, पूर्वीपेक्षा अडचणी कमी असतील. ज्या लोकांना कर्ज घ्यायचं असेल तर त्यांनी घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी संपर्क साधावा.कार्यालयीन कामकाजातील तणाव कमी होण्यास सुरुवात होईल.आरोग्याच्या बाबतीतही थोडी सुधारणा होताना दिसेल. व्यापारी वर्गाचा व्यवहार अगदी सुरळीत चालणार आहे. एकूणच, या आठवड्यात तुम्ही धैर्याने काम करण्याची गरज आहे.  


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात स्वतःवर खूप नियंत्रण ठेवावे लागेल. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करा. तसेच, कोणालाही विचार न करता वचन देऊ नका. आर्थिक बाबतीत तुम्ही सावध राहण्याची गरज आहे.  या आठवड्यात तुम्ही नवीन नोकरीसाठी प्रयत्न केले तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील, उत्पन्नाचे स्रोत वाढेल. अडकलेला पैसा या आठवड्यात परत मिळू शकतो. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. प्रेमाच्या बाबतीतही हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीचे लोक नवीन आठवड्यात अधिक व्यस्त असणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला तुमची कारकीर्द आणि व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. नवीन गोष्टी करण्यात सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात. कोर्टात केस चालू असेल तर त्यासाठी तुम्हाला थोडी जास्त धावपळ करावी लागू शकते. प्रेम संबंध सामान्य असतील. तुमचा तुमच्या प्रियकरासोबत चांगला समन्वय राहील.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ आणि सौभाग्य देणारा आहे. या आठवड्यात तुमची सर्व नियोजित कामं पूर्ण होतील, ज्यामुळे तुमच्यामध्ये काम करण्याचा उत्साह निर्माण होईल. ऑफिसमधील तुमचं काम पूर्ण होईल. तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांचा येणारा आठवडा चांगला जाईल. तुम्ही परदेशात जाण्याचा प्लॅन बनवू शकता. कौटुंबिक प्रश्न सोडवताना वडीलधाऱ्यांची आणि लहानग्यांची मदत मिळेल. या आठवड्यात आरोग्य थोडं खालावलेलं असेल, त्यामुळे आरोग्याची चांगली काळजी घ्या. तुम्हाला ताप, सर्दीसारख्या आजारांचा त्रास होऊ शकतो. या आठवड्यात प्रियकराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात खूप सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. कोणीतरी तुमच्याविरुद्ध कट रचू शकतं. तुमचे काम इतरांवर सोडू नका. कार्यालयीन कामं पूर्ण करण्यासाठी या आठवड्यात तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. या आठवड्यात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुमच्या जोडीदाराशी तुमची जवळीक वाढेल. तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या प्रेमविवाहाला मान्यता देऊ शकतात.व्यवसायासाठी हा काळ अनुकूल राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Taurus Weekly Horoscope 20 to 26 May 2024 : विद्यार्थ्यांसाठी येणारा आठवडा ठरणार लकी, महिलांसाठी कसा असेल मे महिना? वाचा साप्ताहिक राशीभविष्य