Weekly Lucky Zodiacs 29 April to 5 May : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. 29 एप्रिलपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ ठरणार आहे, या काळात तुमची अपूर्ण कामं पूर्ण होतील. नोकरदारांसाठी हा आठवडा भाग्याचा ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटचे दिवस अगदी आनंदाचे जातील. व्यवसायात लाभ होईल. नोकरी बदलायची असेल तर या आठवड्यात चांगल्या संधी मिळतील. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोक या आठवड्यात सुटकेचा नि:श्वास सोडतील, तुमची अपूर्ण राहिलेली अनेक कामं पूर्ण होतील. मित्रांसोबतचा वाद संपेल. व्यवसायातून चांगले परिणाम मिळतील. या आठवड्यात तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. वडिलोपार्जित मालमत्ताही तुम्हाला मिळू. मुलं या आठवड्यात मज्जा करतील आणि खेळण्यात दिवस घालवतील.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली तसेच महत्त्वाचा असेल. या आठवड्यात तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल. न्यायालयीन प्रकरणांत तुमचा विजय होईल. व्यावसायात यश मिळेल. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना करू शकता. जोडीदाराची साथ प्रत्येक टप्प्यावर मिळेल.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. या आठवड्यात तुम्हाला अनेक शुभवार्ता मिळतील. धार्मिक प्रवासाला जाता येईल. प्रत्येक निर्णयात तुम्हाला तुमच्या वडिलांची साथ मिळेल. व्यवसायात अपेक्षित नफा तुमच्यासाठी आनंद देईल. प्रेमसंबंध चांगले राहतील.


मीन रास (Pisces)


मीन राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ आणि भाग्याचा ठरेल. करिअर आणि व्यवसायात येणारे अडथळे या आठवड्यात दूर होतील, चालू असलेल्या कोर्ट केसमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. जीवनाशी संबंधित समस्या दूर करण्यात यश मिळेल. वैवाहिक जीवनातील परस्पर सहकार्यामुळे तुमची चांगली प्रगती होईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Aries Weekly Horoscope 29 April to 5 May : मेष राशीसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे; पगारवाढीसह कौटुंबिक सुख मिळणार? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या