Saptahik Rashifal 26 February To 3 March 2024: फेब्रुवारी महिन्यातील शेवटचा आणि मार्च महिन्यातील पहिला आठवडा हा काही राशींसाठी शुभदायक असून काही राशींना मात्र तब्येत सांभाळावी लागणार आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात काही राशींवर भगवान शंकराची विशेष कृपा आहे. काही राशींसाठी (Weekly Horoscope) हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे. हा आठवडा कोणत्या राशीसाठी फलदायी असणार आहे. काही राशींवर धनवर्षाव होणार तर काही राशींसाठी अचानक प्रवासाचा योग लिहिलेला आहे पण त्यात तुमचा फायदा होणार आहे. या विषयी माहिती घेऊया.
वृषभ (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीसाठी हा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. भगवान शंकराची कृपा या राशीवर असणार आहे. या आठवड्यात तुमच्या आनंदाच्या बातम्या येतीस. अनेक दिवसापासून रखडलेले काम या आठवड्यात पूर्ण होईल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे तुम्हाला योग्य फळ मिळेल. करिअर संदर्भात आनंदवार्ता मिळेल. वैवाहिक आयुष्य चांगले असेल.
कर्क (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशींसाठी हा आठवडा फलदायी असणार आहे. या आठवड्यात कोणताही निर्णय घेताना दोनदा विचार करा. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर इतरांना आकर्षित कराल. नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक (Scorpio Weekly Horoscope)
हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मोठ्या संधीचा असणार आहे. ऑफिसमधील तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. वैवाहिक जीवनात आनंद असेल. नवीन लोकांशी झालेली ओळख फयद्याची ठरेल. तुमचे लक्ष्य गाठण्यासाठी तुम्ही खूप परिश्रम कराल. काहींना परदेशात जाण्याची संधी आहे. सुख समृद्धी येईल.
मीन (Pisces Weekly Horoscope )
या आठवड्यात तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. नशीबाची साथ मिळेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा भरभराटीचा आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. भगवान शंकराची कृपा असणार आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. करिअर संदर्भात मोठा निर्णय घ्याल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :