Weekly Horoscope 1-7 April 2024 : एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. मेष आणि वृश्चिकसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. एप्रिलचा नवीन आठवडा (1 April To 7 April Weekly Horoscope) तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात प्रगती दिसेल. तुमचा मान-सन्मान वाढेल. या आठवड्यात मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल. कुटुंबात काही कलह चालू असेल तर तो वडिलधाऱ्या व्यक्तीच्या पुढाकाराने सोडवला जाईल. न्यायालयीन प्रकरणं सुटतील.प्रेम संबंधांसाठी हा आठवडा चांगला राहील. कुटुंबातील वातावरण हलकं आणि आनंदी राहील. नोकरदारांनाही कामावर चांगले परिणाम पाहायला मिळतील.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांच्या काही मोठ्या समस्या या आठवड्यात संपतील. नशीब तुम्हाला साथ देईल. तुमचे विरोधक तुमच्या विरोधात कोणतंही षडयंत्र रचत असतील तर ते त्यात अयशस्वी होतील. जर तुम्ही आधी काही कामात पैसे गुंतवले असतील तर या आठवड्यात तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकेल. प्रियकराशी संबंध उत्तम राहतील आणि जवळीक वाढेल, तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचं सहकार्य लाभेल.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा धावपळीचा असेल. आरोग्याची चांगली काळजी घ्या. मालमत्तेशी संबंधित कामात अडचणी येऊ शकतात. या आठवड्यात तुम्हाला कोर्टाच्याही फेऱ्या माराव्या लागतील. कौटुंबिक सदस्यांसोबत तुमचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर वडिलधाऱ्यांचा सल्ला जरूर घ्या. व्यवसायासाठी वेळ उत्तम राहील, व्यवसायातून तुम्हाला फायदा होईल.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर आहे. या आठवड्यात तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो. या आठवड्यात तुमचा तुमच्या मुलांशी काही मुद्द्यावरुन मतभेद होऊ शकतात. या आठवड्यात तुम्हाला अचानक मोठा खर्च करावा लागू शकतो, यामुळे तुम्हाला पैशाची चिंता सतावेल. प्रेमसंबंधात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश तुमचं नातं बिघडवू शकतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत खर्च वाढेल.


सिंह रास (Leo)


या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांनी कोणतेही काम किंवा निर्णय घेण्यापूर्वी एकदा काळजीपूर्वक विचार करावा. तुम्हाला कोणी सल्ला दिला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. विनोद करताना काळजी घ्या की, तुमच्या बोलण्याने कोणाचं मन दुखावलं जाणार नाही. या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात वाढ पाहू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेत काही अडचणी येऊ शकतात. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही रोमँटिक राहाल, तुम्हाला तुमच्या प्रियकराचं सहकार्य मिळेल.


कन्या रास (Virgo)


नवीन आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देणारा ठरेल. तुमचं नियोजित काम या काळात पूर्ण होईल. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला चांगली ऑफर मिळू शकते. या आठवड्यात तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळू शकतात. आरोग्याबाबत सावध राहा, अन्यथा त्रास सहन करावा लागू शकतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुमचा आत्मविश्वास वाढेल, पण अनेक समस्या तुम्हाला सतावतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Horoscope 1 to 7 April : मेष ते मीन, 12 राशींसाठी पुढचा आठवडा खास; जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक