Ahmednagar Lok Sabha Election 2024 : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Lok Sabha Constiruency) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीने निलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंके हे थेट संगमनेरमध्ये (Sangamner) काँग्रेस नेते (Congress Leader) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या भेटीला पोहोचले. संगमनेर शहरातील सुदर्शन या निवासस्थानी मध्यरात्री बाळासाहेब थोरात आणि निलेश लंके यांची भेट झाली. यानंतर दोघांत जवळपास दीड तास प्रदीर्घ चर्चा झाली.
संगमनेर उमेदवारी जाहीर होताच निलेश लंके थोरातांच्या भेटीला
अहमदनगर ((Ahmednagar) जिल्हाच नव्हे तर राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) सुद्धा विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष नेहमीच दिसून आला आहे. निलेश लंके यांना शनिवारी अधिकृत उमेदवारी जाहीर झाली, त्यानंतर निलेश लंके यांनी थेट विखे विरोधक आणि राज्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधील निवासस्थानी मध्यरात्री त्यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. बाळासाहेब थोरात यांनी लंके यांना काय कानमंत्र दिला हे आगामी काळात दिसून येईल.
विखेंबाबत अहमदनगर दक्षिणची जनता निर्णय घेईल
राज्यातील सुसंस्कृत नेता म्हणून ओळख असलेल्या थोरात साहेबांची भेट घेतली. निवडणुकीला सामोरे कसं जायचं याचा मार्गदर्शन घेतलं असून विखेंबाबत अहमदनगर दक्षिणची जनता निर्णय घेईल, असा विश्वास लंके यांनी व्यक्त केला आहे. तसेच निलेश लंके हा छोटा कार्यकर्ता असला तरी फार गुणी आहे. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा हा कार्यकर्ता असून अहमदनगर दक्षिणची लढाई ही श्रीमंत विरुद्ध गरीबी अशी असून यात निलेश लंके विजय होतील, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
अहमदनगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके लढत
राष्ट्रावादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या पहिल्या यादीमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधून निलेश लंके यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून तगडा उमेदवार शोधला जात होता. त्यानंतर शनिवारी निलेश लंके यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) विरुद्ध निलेश लंके (Nilesh Lanke) अशी लढत पाहायला मिळणार आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :