Weekly Horoscope 9 To 15 June 2025: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्याचा 9 ते 15 जूनचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. एप्रिल महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? धनु आणि मकर राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
धनु रास साप्ताहिक राशीभविष्य (Sagittarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - तूळ राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद वाढेल. अविवाहित लोकांना लग्नाचा किंवा नवीन नात्याचा प्रस्ताव मिळू शकतो. प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा राखणे महत्वाचे आहे, अन्यथा गैरसमज होऊ शकतात.
करिअर (Career) - तूळ राशीच्या करिअरबाबत बोलायचं झाल्यास, कामाच्या ठिकाणी नवीन संधी येऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि त्यांच्या कामाचे कौतुकही होईल. सरकार किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना प्रगतीचे संकेत मिळतील.
आर्थिक स्थिती (Wealth) - तूळ राशीच्या लोकांना सल्ला देण्यात येतोय, गुंतवणूक करताना काळजी घ्या. सध्या धोकादायक व्यवहारांपासून दूर राहणे चांगले. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
आरोग्य (Health) - तूळ राशीच्या लोकांचे आरोग्य सामान्य राहील, परंतु खाण्यापिण्यात निष्काळजीपणामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. गॅस, अॅसिडिटी आणि थकवा टाळण्यासाठी नियमित दिनचर्या पाळा. हलका व्यायाम आणि ध्यान तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
मकर रास साप्ताहिक राशीभविष्य (Capricorn Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - वैवाहिक जीवनात एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक असेल. प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येईल आणि तुम्ही जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क स्थापित करू शकाल.
करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी तुमच्या कठोर परिश्रमाचे योग्य परिणाम तुम्हाला मिळतील. तुमच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महत्त्वाच्या सूचना मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात स्थिरता येईल, परंतु सध्या मोठी गुंतवणूक टाळणे चांगले. कामाच्या ठिकाणी जुने वादही सोडवता येतील.
आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. मात्र शेअर बाजार किंवा धोकादायक गुंतवणुकीपासून दूर रहा.
आरोग्य (Health) - आरोग्य सामान्य राहील, परंतु हाडे, सांधे आणि त्वचेशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. कॅल्शियमयुक्त आहार घ्या आणि जास्त वेळ एकाच स्थितीत बसणे टाळा. मानसिक ताणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Sign: जूनच्या दुसऱ्या आठवड्यात धनलक्ष्मी राजयोगाचे संकेत, 'या' 5 राशी होणार मालामाल! साप्ताहिक भाग्यशाली राशी जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.