Weekly Horoscope 9 To 15 June 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्याचा दुसऱा आठवडा लवकरच सुरु होतोय. हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. त्यामुळे जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मेष रास साप्ताहिक राशीभविष्य (Aries Weekly Horoscope)


लव्ह लाईफ (Love Life) - मेष राशीसाठी नवीन आठवडा फार भावनिक असणार आहे. आपल्या पार्टनरप्रती तुम्ही फार पझेसिव्ह असाल. पार्टनरचे सगळे गुण तुम्हाला आवडतील. तसेच, संवाद देखील चांगला साधाल. नवीन गोष्टी एकत्र शिकाल. 


करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, करिअरमध्ये उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. प्रामाणिकपणाने तुम्ही तुमचं काम कराल. तुमच्या कामाबाबत बॉसकडून तुमचं कौतुक केलं जाईल. नवीन गोष्टी शिकायला मिळतील. 


आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. मात्र, तुमच्या आर्थिक स्थितीचा कोणालाच गैरफायदा घ्यायला देऊ नका. पैशांच्या गुंतवणुकीकडे देखील लक्ष देण्याचा प्रयत्न करा. तसेच, शहानिशा केल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका. 


आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्यावं. यासाठी नियमित व्यायाम करा. तसेच, आहारात थोडाफार बदल करा. प्रोटीनचं प्रमाण वाढवा. 


वृषभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Taurus Weekly Horoscope)


लव्ह लाईफ (Love Life) - वृषभ राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात पार्टनरबरोबर तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवाल. तुमच्यात चांगला संवाद साधता येईल. तसेच, भूतकाळातील गोष्टींबाबतही अनेक खुलासे मिळतील.


करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमची समर्पण वृत्ती दिसून येईल. कोणत्याही नवीन प्रोजेक्टवर काम करताना तुम्ही मनापासून कराल. तुमच्या कामाबाबत कोणालाही शंका उपस्थित होणार नाही.


आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगली स्थिरता येईल. पैशांची बचत करण्याकडे तुमचा कल जास्त वाढलेला दिसेल. तसेच, भविष्यासाठी चांगली गुंतवणूक कराल.


आरोग्य (Health) - तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आठवड्याच्या शेवटी तुमचा दिर्घकालीन आजार पुन्हा वर डोकावू शकतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:     


Weekly Horoscope 9 To 15 June 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी जून महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य