Weekly Horoscope 9 To 15 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. जून महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे हा महिना फार खास असणार आहे. अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीसाठी नवीन आठवडा भाग्यशाली असणार आहे. मात्र, तितकाच आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात तुमचं मन अशांत राहील. त्यामुळे ध्यान आणि योग करणं लाभदायी ठरेल. तसेच, समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींबरोबर तुमच्या भेटीगाठी होतील. बौद्धिक क्षमतेला वाव मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल.
वृषभ रास (Taurus WeeklY Horoscope)
वृषभ राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात मुलांच्या शैक्षणिक अभ्यासाला सुरुवात होईल. तसेच, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. इतरांवर लगेच विश्वास ठेवू नका. तसेच, कोणाबरोबरही पैशांचा व्यवहार करणं तुमच्यासाठी फार घातक ठरेल. त्यामुळे सावधानता बाळगणं फार गरजेचं आहे.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. तसेच, कामाच्या प्रती प्रामाणिक असणं गरजेचं आहे. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून काहीतरी शिकवण मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. लवकरच प्रवासाला जाण्याचा योग जुळून येणार आहे.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. या दरम्यान तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.भावा-बहिणींचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला पैशांची कमतरता जाणवू शकते.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीसाठी नवीन आठवडा सकारात्मक असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमची नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तसेच, जुन्या चुकांमधून नवीन बोध घ्याल. मित्र-मैत्रींणींशी सामंजस्याने वागाल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. आरोग्य सामान्य राहील.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या दरम्यान कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमची कामे लवकर आटपतील. तसेच, पैशांची गुंतवणूक करायची असल्यास हा आठवडा फार शुभ असणार आहे. मानसिक शांततेसाठी नियमित योग आणि ध्यान करणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :