Weekly Horoscope 7 To 13 July 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै महिन्याचा नवीन आठवडा उद्यापासून सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जुलैच्या नव्या आठवड्यात सूर्य ग्रहाचं संक्रमण होणार आहे. ग्रहांच्या या शुभ स्थितीमुळे, 5 राशीच्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. या राशींना केवळ करिअरमध्ये यश मिळणार नाही तर मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता देखील असेल. जुलैचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल यासाठी जाणून घेऊयात 5 भाग्यवान राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope).
मेष रास (Aries Horoscope)
सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा मेष राशीचा चांगलाच लाभ मिळणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. तसेच, जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असल्यास नवीन आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या प्रथम चरणात मिथुन राशीचं संक्रमण होणार आहे. तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुमची निर्णय घेण्याची क्षमता दिसून येईल. नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या अकराव्या चरणात सूर्याचं संक्रमण होणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या चांगला लाभ मिळेल. तसेच, मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. गुरु ग्रहाच्या उपस्थितीमुळे तुमचे सामाजिक नातेसंबंध मजबूत होतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन आठवडा महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही मेहनत घेतलेलं कार्य मार्गी लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक वातावरण पाहायला मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, परदेशात जाण्याची संधी चालून येईल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा लाभदायक ठरेल. मुलांच्या कलागुणांना चांगला लाभ मिळेल. तसेच, आध्यात्मिक गोष्टींमध्ये तुम्ही रमाल. मित्र-परिवाराबरोबर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. तसेच, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडा बदल करण्याची गरज आहे. तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत चालेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :