Weekly Horoscope 30 December 2024 To 05 January 2025 : 2024 वर्ष संपायला अवघे काही दिवस आहे. नवीन वर्षाची सांगता होतानाच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण सारेच उत्सुक आहोत. मात्र, नवीन वर्षाचा पहिला आठवडा आपल्या सगळ्यांसाठीच खूप खास असतो. नवीन वर्षात आपण अनेक संकल्प करतो. मात्र, हे संकल्प पूर्ण होतीलच असे नाही. त्यामुळे अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


तूळ रास (Libra Weekly Horoscope) 


तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त असाल. तुमच्यावर भरपूर कामाचा लोड असेल मात्र, तरीही तुम्ही आनंदी असाल. नवीन वर्षात तुमचा कामाकडे जास्त कल असेल. त्यामुळे इतरांच्या वादापासून तुम्ही दूर राहाल. 


वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अनावश्यक खर्चापासून दूर राहावे लागेल. अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. नवीन आठवड्यात तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुमच्यासाठी उत्पन्नाच्या अनेक संधी निर्माण होतील.


धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाची कमतरता भासू शकते. अशा वेळी पैशांचा जपून वापर करा. तुमच्या मार्गात अनेक अडथळे येऊ शकतात. अनेकजण तुमचं लक्ष विचलित करु शकतात. मात्र, नशिबाची साथ तुम्हाला मिळेल.


मकर रास (Capricorn Weekly Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात नवीन माणसांशी तुमच्या भेटीगाठी होतील. तसेच, तुमचा धार्मिक यात्रेला जाण्याचा योग येईल. जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या आठवड्यात करु शकता. तुम्हाला चांगला नफा मिळेल. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहणं गरजेचं आहे. 


कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा लाभदायक ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ होईल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.  


मीन रास (Pisces Weekly Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कोणत्याच गोष्टीची चिंता भासणार नाही. ग्रहांची स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा जास्त ताण जाणवणार नाही. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. शत्रूंपासून दूर राहाल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य