Weekly Horoscope 30 December 2024 To 05 January 2025 : 2024 वर्ष संपायला अवघे काही दिवस आहे. नवीन वर्षाची सांगता होतानाच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण सारेच उत्सुक आहोत. मात्र, नवीन वर्षाचा पहिला आठवडा आपल्या सगळ्यांसाठीच खूप खास असतो. नवीन वर्षात आपण अनेक संकल्प करतो. मात्र, हे संकल्प पूर्ण होतीलच असे नाही. त्यामुळे अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मेष रास (Aries Weekly Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमच्याकडे चांगली आर्थिक संपत्ती असेल. तुमचा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या जवळची व्यक्ती नाराज असेल तर तिची समजूत घालण्यात तुम्हाला यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही जे नियोजन केलं आहे ते पूर्ण होईल. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल. या आठवड्यात तुमचं मन प्रसन्न असेल. तुम्हाला चिंता भासणार नाही. 


वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार अनुकूल असणार आहे. या काळात तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, धार्मिक यात्रेला जाण्याचा शुभ योग जुळून येणार आहे. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला पैशांची कमतरता जाणवू शकते. तसेच, तुम्हाला मित्रांचा चांगला सहयोग मिळेल. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. 


मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे.या आठवड्यात तुम्हाला ना लाभ होणार ना तोटा होणार. आठवड्याच्या शेवटी तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. अशा वेळी तुमचे विरोधक तुमच्यावर नजर ठेवून असतील. त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या मुलांचा चांगला सपोर्ट मिळेल. 


कर्क रास (Cancer Weekly Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाचा पहिला आठवडा शुभ असमार आहे. या आठवड्यात तुमच्या प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतील. तसेच, धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून आला आहे. आठवड्याच्या मध्यात तुमचे कुटुंबियांबरोबर किंवा तुमच्या मित्रपरिवारा बरोबर वैचारिक मतभेद होऊ शकतात. त्यामुळे विनाकारण वाद घालू नका.


सिंह रास (Leo Weekly Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. तुम्ही ठरवलेली सर्व कामे तुमच्या मनाप्रमाणे झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, तरुणांचे नोकरी संदर्भातील प्रश्न लवकरच सुटतील. 


कन्या रास (Virgo Weekly Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवड्याची सुरुवात फार चांगली असणार आहे. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. या आठवड्यात तुम्ही यात्रेला जाण्याचा देखील योग जुळून आला आहे. तुमची ही यात्रा चांगली पार पडले. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Gochar 2024 : मार्गीनंतर शनीने पहिल्यांदाच बदलली चाल; 'या' 3 राशींच्या मार्गातील अडथळे होतील दूर, चौफेर होणार धनलाभ