Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 Lucky Zodiacs : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. हा आठवडा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. व्यवसायांना अधिक नफा मिळेल. तुमचं लव्ह लाईफ आधीपेक्षा चांगलं असेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम पहाल.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर अमाप यश मिळवू शकता. या आठवड्यात तुम्हाला मानसिक समाधान आणि शांती मिळेल. करिअर-व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ लाभदायक आहे. नोकरदार महिलांना कामात मोठं यश मिळेल.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप भाग्यवान असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अशा अनेक संधी भेटतील, ज्या तुम्हाला प्रगतीच्या मार्गाकडे घेऊन जातील. तोपर्यंत धीर धरावा लागेल. तुम्हाला लवकरच काही मोठं यश मिळेल. तुमच्या आजूबाजूचे लोक, विशेषतः तुमचे सहकारी तुम्हाला यश मिळवण्यास मदत करतील. घर आणि कामाच्या ठिकाणी आजूबाजूचे सर्व लोक तुम्हाला यश मिळवण्यात मदत करतील.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांना येत्या आठवड्यात आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला अपेक्षित यश मिळवायचं असेल तर तुमची ऊर्जा वाया जाऊ देऊ नका. आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका. तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी सावलीसारखा उभा राहील. कोणताही निर्णय घेताना भावनेच्या भरात घेऊ नका.


कुंभ रास (Aquarius)


येणारा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येक लहान-मोठा व्यक्ती तुमच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसेल. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमचा शोध संपणार आहे. तुम्ही व्यवसाय करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. आठवड्याच्या मध्यात तुम्ही घरासाठी पैसे खर्च करू शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या