Weekly Horoscope 26 May To 1 June 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, मे महिन्याचा शेवटचा आठवडा अवघ्या काही दिवसांतच सुरु होणार आहे. या कालावधीत शनिमहाराजांची शनी जयंती आहेच. पण, त्याचबरोबर, राहू केतू ग्रहाचं संक्रमण, सूर्य ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे हा आठवडा फार खास आहे. मे महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास साप्ताहिक राशीभविष्य (Aries Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - मेष राशीसाठी नवीन आठवडा प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर चांगला संवाद साधाल. तसेच, पार्टनरबरोबर क्वालिटी टाईम स्पेन्ड कराल. पार्टनरप्रती तुम्ही अधिक भावनिक असाल. 

करिअर (Career) - तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक जबाबदाऱ्या उचलाव्या लागतील. तसेच, जास्तीत जास्त वेळ विचारात वाया न घालवता कृतीत घालवा. यामुळे तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल. तसेच, तुमच्यातील लीडरशिप क्वालिटी दाखवा.

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा सुवर्णकाळ असणार आहे. तसेच, या कालावधीत तुम्ही नवीन वाहनांची देखील खरेदी करु शकता. शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा.

आरोग्य (Health) - तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच, यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करण्याची गरज आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Taurus Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. तसेच, जे लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच चांगला लाईफ पार्टनर भेटेल. आठवड्याची सुरुवात छान रोमॅंटिक असणार आहे.  

करिअर (Career) - जे लोक फॅशन, टेक्स्टाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंशी संबंधित काम करतायत त्यांना भविष्यात चांगल्या संधी चालून येतील. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला चांगलंच मिळेल. नवीन प्रोजेक्टवर काम करु शकता.

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, पैशांची बचत करा. विनाकारण पैसे खर्च करु नका. जर, तुम्हाला चांगला बिझनेस करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागेल. त्यामुळे, मैहनतीला पर्याय नाही. 

आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुम्ही मानसिक आरोग्यावर भर द्या. बदलत्या वातावरणाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यासाठी बाहेरचे तेलकट आणि तिखट अन्नपदार्थ खाणे टाळा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:     

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी मे महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य